Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंनी नवा डाव टाकला; भाजपच्या सरकारच्या दुखऱ्या नसेवर ठेवलं बोट

अभिजीत दिपकेंनी नवा डाव टाकला आहे. दिपकेंनी भाजपच्या सरकारच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. यामुळे भाजप सरकारचं टेन्शन वाढलं आहे.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंनी नवा डाव टाकला; भाजपच्या सरकारच्या दुखऱ्या नसेवर ठेवलं बोट
Image Credit source: tv9
| Updated on: Nov 23, 2026 | 11:10 AM

गोवा विधानसभा निवडणुकीआधी कॉक्रोच जनता पार्टीने भाजप सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वातील सीजेपी गोव्याच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. गोव्यात प्रेशर ग्रुपसारखं काम करणार असल्याचे दिपकेंनी जाहीर केले.  अभिजीत दिपके हे विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर करणार आहेत. परंतु त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

अभिजीत दिपकेंनी म्हटलं की, मी निवडणूक लढण्यास आलो नाही, तर तरुणांना साथ देण्यास आलो आहे. कलम ३९ ए रद्द करण्यात यावं, याला प्राधान्य देणार आहे. स्थानिकांनी या कलमाला विरोध दर्शवलाय. याच कलमाच्या विरोधात सीजेपीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. सीजेपीने दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्याने भाजप सरकारची डोकेदुखी वाढली आहे. सीजेपी नेते आशुतोष रांका यांनी म्हटलं की, आम्ही गोव्यात अनेक दिवसांच्या वास्तव्यांसाठी आलो आहोत. आम्हाला भारताचं रक्षण करायचं आहे. तसेच भारताला घडवायचं आहे. 75 वर्षांचे महामानव या देशाचे भविष्य नाहीत. तर तरण हे देशाचे भविष्य आहेत’.

Loading...

काय आहे 39 ए कलम?

2024 सालच्या एका दुरुस्तीनुसार,  गोवा नगर आणि ग्राम  नियोजन अधिनियम, 1974 मध्ये  कलम 39 ए जोडण्यात आलाय. या कायद्याअंतर्गत मंडळाच्या मंजुरीनंतर कोणत्याही भुखंडाचा झोन बदलता येईल.  यासंदर्भात जनतेने आक्षेप मागवले जातील. यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. परंतु हे कलम हटवण्यासाठी स्थानिक रहिवासी आंदोल करताहेत. या कायद्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.  कॉक्रोच जनता पार्टीचे आशुतोष रांका म्हणाले, एक देशव्यापी आंदोलनाने सर्वांना एकत्र आणलंय. दिवाळीत सर्व जण कुटुंबासोबत होते. तर आता एका व्यासपीठावर एकत्र आलेत. आम्ही एका व्यक्तीच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं. सीजेपी आता काही दिवस गोव्यात असेल. झुरळ कधीच मरत नाही’. सीजेपीचे सर्व सदस्य थोड्या विश्रांतीवर होते. त्यामुळे काही काळासाठी सीजेपी शांत होती’.  सीजीपेच्या आक्रमक भूमिकने गोव्यातील भाजप सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us