AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: मला अरेस्ट करायचे असेल ना तर…आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके असं काय म्हणाला?

Abhijeet Dipke CJP: अभिजीत दिपके आता मुंबईहून दिल्लीच्या दिशेने रवाना झाला आहे. आता मुंबईतील एअरपोर्टवरुन जेव्हा तो निघाला तेव्हा त्याने सरकाराला एक इशारा दिला आहे.

Abhijeet Dipke: मला अरेस्ट करायचे असेल ना तर...आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके असं काय म्हणाला?
| Updated on: Oct 10, 2026 | 8:52 AM
Share

Abhijeet Dipke CJP Protest: दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पक्षाच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शहरभरात सुमारे २५,००० पोलीस आणि निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली मेट्रोच्या ४५ स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. दिल्ली  रेल्वे स्थानके, बस टर्मिनल्स या ठिकणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आज आंदोलन होणार आहे. प्रस्तावित आंदोलनाच्या परवानगीसाठीचा औपचारिक अर्ज नाही, असे सांगून पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही आज आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी अभिजीत दिपके मुंबईतहून दिल्लीच्या दिशेने रवाना झाला आहे. आता रवाना होण्यापूर्वी अभिजीत दिपकेने थेट सरकारला इशारा दिला आहे.

दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनासाठी रवाना होण्यापूर्वी अभिजीत दीपके म्हणाले, “जर त्यांना मला ताब्यात घ्यायचे किंवा अटक करायची असेल, तर ते करू शकतात. मी त्यासाठी तयार आहे. त्यांनी मला अटक करावे किंवा ताब्यात घ्यावे, मला काही फरक पडत नाही. त्यांना यूएपीए लावावा लागो, एनएसए लावावा लागो, त्यांना जे हवे ते करू द्या. पण आम्ही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी आणि या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच ठेवू.”

सीजेपीच्या आंदोलनापूर्वीच पोलीस कारवाई सुरू झाली आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सुमारे २०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंडी हाऊसपासून जनपथ आणि पार्लमेंट स्ट्रीटपर्यंत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.  कॉकरोच जनता पार्टीच्या आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ले मेरिडियन हॉटेलजवळील चौकात मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या जवानांव्यतिरिक्त, सुरक्षा व्यवस्थेमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ), दिल्ली पोलिसांचे पिंक फोर्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या जवानांचाही समावेश आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चौकाच्या परिसरात निगराणी वाढवण्यात आली आहे.

Follow Us
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच