लोकसभा निवडणुकीचा दाखला अन् ‘ज्ञानू’ असा उल्लेख; ज्ञानेश कुमारांवर अभिजीत दीपकेंचा मोठा आरोप, म्हणाले…

Abhijeet Dipke On Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांना 'ज्ञानू' म्हणत अभिजीत दीपकेंनी टोला लगावला आहे. अभिजीत दीपकेंनी पोस्टमधून गंभीर आरोप केले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा दाखला अन् ज्ञानू असा उल्लेख; ज्ञानेश कुमारांवर अभिजीत दीपकेंचा मोठा आरोप, म्हणाले...
| Updated on: Sep 26, 2026 | 9:05 PM

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी निवडणूक आयोगाच्या वादाच्या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. अभिजित दीपकेंनी ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप केला आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे. तसेच ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये त्यांनी सीईसी ज्ञानेश कुमार यांचा उल्लेख ‘ज्ञानू’ असा केला. त्यानंतर ‘ज्ञानूला जावेच लागेल’ असे म्हटले आहे.

कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दीपकेंनी एका अहवालाचा हवाला देत मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी केरळचे माजी मुख्य सचिव जी. जी. थॉमसन यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवण्यास सांगितले असल्याचा आरोप केला आहे. तर दुसऱ्या एका ‘एक्स पोस्ट’मध्ये ते म्हणाले की, ते मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेतील. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तरुण मतदारांना सहभागी करून घेण्यासाठी दिल्लीतील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करणार असल्याची घोषणा केली आहे. हे कार्यक्रम २९ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर दरम्यान आयोजित केले जातील. याच मुद्द्यावरून कॉकरोच जनता पक्षाचे नेते अभिजीत दीपके यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. हे यापूर्वी का झाले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

अभिजीत दीपकेंनी एक फोटो पोस्ट करून लिहिले की, “हे आधी का केले नाही?” अभिजीत दीपकेंकडून निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी जेव्हा निवडणूक आयोगाबाबत वृत्ते समोर आली होती, तेव्हा अभिजीत दीपकेंनी पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांच्या आत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. असे न झाल्यास कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा धरणे आंदोलन करेल, अशी धमकीही त्यांनी दिली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us