अभिजीत दिपके यांना हादरा, अमेरिकेतील एआय स्टार्टअपमध्ये थेट सर्व माहिती, दिल्लीतच..

अभिजीत दिपके यांच्या सीजेपीची महत्वाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या बैठकीला महत्वाच्या सदस्यांना निमंत्रण देण्यात आले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिजीत दिपके यांनी मोठे आवाहन केले.

अभिजीत दिपके यांना हादरा, अमेरिकेतील एआय स्टार्टअपमध्ये थेट सर्व माहिती, दिल्लीतच..
Abhijit Dipke
| Updated on: Aug 07, 2026 | 7:25 AM

कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन देशभरात बघायला मिळाले. जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला इतके जास्त यश मिळाले की, थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. ज्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पुढे कॉकरोच जनता पार्टीची भूमिका नक्की काय असणार याबाबत चर्चा रंगताना होती. अभिजीत दिपके यांनी पक्षाची दोन दिवसीय बैठक त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी आयोजित केली. या बैठकीला त्यांनी पुढील ध्येय धोरणे ठरवली. अभिजीत दिपके आणि त्यांची पार्टी देशभरातील लोकांसोबत संवाद साधणार आहे. शिक्षण, बेरोजगारी अशा विविध प्रश्नांवर ते सरकारविरोधात लढा देणार आहेत. यादरम्यान अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठे आवाहन केले.

अभिजीत दिपके यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी 15 ऑगटच्या आगामी भाषणात जनरेशन झेड आणि तरुणांशी संबंधित संबंधित भाष्य करावे. यासोबतच अभिजीत दिपके यांना मोठा धक्का बसलाय. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी काही आरोपही केले. भारत मंडपम येथे झालेल्या फ्युचरक्राईम समिट 2026 दरम्यान अमेरिकेतील एका एआय स्टार्टअप @RESecurity ने त्यांचे एआय टूल प्रदर्शित करण्यासाठी माझी माहिती सादर केली.

समिटला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मला सांगितल्यानुसार, तिथे अनेक सरकारी अधिकारीही उपस्थित होते. यादरम्यान अभिजीत दिपके यांनी म्हटले की, सरकार नक्की कोणाची मदत करत आहे. यादरम्यान अभिजीत दिपके यांनी फोटोही शेअर केला. माझी माहिती एआय टूलमध्ये देण्याची यांना परवानगी कोणी दिली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एआय टूलमध्ये अभिजीत दिपके यांची सर्व माहिती देण्यात आली. ज्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत सीजेपीने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. देशभरातील लोकांच्या समस्या त्यांच्याकडून जाणून घेतल्या जाणार आहेत. सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या वाढलेल्या फिससंदर्भात ते रस्त्यावर उतरणार आहेत. 12 जणांची कार्यकारी देखील जाहीर करण्यात आली. पहिल्याच आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. पुढेही मोठे धमाके कॉकरोच जनता पार्टी करण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us