West Bengal Election 2021: मिथुन चक्रवर्ती यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

| Updated on: Mar 07, 2021 | 1:24 PM

आज सकाळीच मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. | Mithun Chakraborty joins BJP

West Bengal Election 2021: मिथुन चक्रवर्ती यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पश्चिम बंगालमधील प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, मुकुल रॉय, सुवेंदु अधिकारी हे नेते उपस्थित होते. (Actor Mithun Chakraborty joins BJP)

थोड्याचवेळात पंतप्रधान नरेंद्र मोदीही याठिकाणी येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांना भाषण करण्याची संधी मिळेल, अशी चर्चा आहे. यावेळी मिथुन चक्रवर्ती यांच्या इच्छेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटतात का, हेदेखील पाहावे लागेल.

तत्पूर्वी आज सकाळीच मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. कैलास विजयवर्गीय हे मिथुन चक्रवर्ती यांच्या बेल्गाचिया येथील निवासस्थानी गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. तेव्हा मिथुन चक्रवर्ती आज भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मिथुन चक्रवर्तींची अट?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटल्यानंतर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याशी मिथुन यांनी फोनवरून ही इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पश्चिम बंगालमध्ये येणार आहेत.

कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पंतप्रधान मोदींची पहिली सभा होणार आहे. यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणआधी मिथुन चक्रवर्ती यांचे भाषण होणार असल्याचीही चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी रेल्वे मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार?, नाराज 76 नेते मुकुल रॉय यांना भेटले; भाजप प्रवेशाची शक्यता

ममता बॅनर्जींविरोधात मुख्यमंत्रीपदाचा भाजपचा चेहरा कोण? दिग्गज क्रिकेटपटुच्या नावाची जोरदार चर्चा

मिथुन चक्रवर्तींना मोदींना भेटायचंय, भाजप नेत्याला फोनवरून साकडे; बंगालच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी?

(Actor Mithun Chakraborty joins BJP)