AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींविरोधात मुख्यमंत्रीपदाचा भाजपचा चेहरा कोण? दिग्गज क्रिकेटपटुच्या नावाची जोरदार चर्चा

सौरव गांगुलीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून ममता बॅनर्जी यांच्याविरोधात रिंगणात उतरावे, अशी भाजपची इच्छा आहे. | Sourav Ganguly BJP CM face

ममता बॅनर्जींविरोधात मुख्यमंत्रीपदाचा भाजपचा चेहरा कोण? दिग्गज क्रिकेटपटुच्या नावाची जोरदार चर्चा
तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ
| Updated on: Mar 03, 2021 | 3:44 PM
Share

नवी दिल्ली: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार (BJP CM Candidate) कोण, याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेत आता अनपेक्षितपणे भारतीय क्रिकेट संघाच माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly)  याचे नाव पुढे येताना दिसत आहे. सध्या कोलकाला आणि दिल्लीतील भाजपच्या वर्तुळात सौरव गांगुलीच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सौरव गांगुलीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून ममता बॅनर्जी यांच्याविरोधात रिंगणात उतरावे, अशी भाजपची इच्छा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये सौरव गांगुलीच्या प्रकृतीमध्ये आलेले चढउतार पाहता हे कितपत शक्य आहे, याविषयी शंका आहे. (Buzz about Sourav Ganguly is BJP CM face in West Bengal)

भाजप सौरव गांगुलीच्या नावासाठी आग्रही का?

पश्चिम बंगालमध्य मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी भाजपकडे नेत्यांची वानवा नाही. मात्र, हा चेहरा बंगाली अस्मितेला साद घालणारा आणि जनतेला आपलासा वाटणारा हवा, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत बराच खल सुरु आहे. सौरव गांगुलीने ही ऑफर नाकारल्यास तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बड्या नेत्यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपादाचा दावेदार म्हणून रिंगणात उतरवले जाऊ शकते.

ममता बॅनर्जींच्या कडव्या नेतृत्त्वाचे आव्हान

ममता बॅनर्जी या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. नरेंद्र मोदी किंवा अमित शाह सोडले तर ममता बॅनर्जी यांच्या ताकदीचा नेता बंगाल भाजपमध्ये नाही. अशावेळी सौरव गांगुलीसारखा बंगाली अस्मितेला साद घालणार नेता रिंगणात आल्यास भाजपला फायदा होऊ शकतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळवला होता. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 मतदारसंघ जिंकून आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल.

संबंधित बातम्या:

सौरभ गांगुलीला दिलेली जमीन परत घेणार, ममता सरकारकडून प्रक्रिया सुरु

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा सौरव गांगुलीच्या पत्नीला फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

सौरव गांगुलीचा हार्ट अटॅक बंगालमध्ये कुणाला राजकीय झटका देणार?

(Buzz about Sourav Ganguly is BJP CM face in West Bengal)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.