कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता आणखी एक नवा पक्ष मार्केटमध्ये, तरुणाईचा मिळतोय मोठा प्रतिसाद, नाव ऐकून डोक्याला हात लावाल

मोठी बातमी समोर येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीला तरुणाइचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, त्यानंतर आता मार्केटमध्ये आणखी एक नवा पक्षा आला असून, त्यालाही तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता आणखी एक नवा पक्ष मार्केटमध्ये, तरुणाईचा मिळतोय मोठा प्रतिसाद, नाव ऐकून डोक्याला हात लावाल
Cockroach Janata Party
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 22, 2026 | 7:38 PM

कॉक्रोच जनता पार्टीने भारतीय सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कॉक्रोच जनता पार्टीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या पार्टीच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाई झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी देशात कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली. अवघ्या पाच दिवसांमध्ये या पार्टीचे इन्स्टाग्रामवर 10.5 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. मराठी तरुण असलेल्या अभिजित दिपके यांनी या कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. दरम्यान आता या कॉक्रोच जनता पार्टीची क्रेझ पाकिस्तानमध्ये देखील पोहोचली आहे.

भारतात स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या धरतीवर आता पाकिस्तानमध्ये कॉक्रोच अवामी पार्टी (CAP) आणि कॉक्रोच अवामी लीग (CAL) ची स्थापना करण्यात आली आहे. या पक्षाचे सोशल मीडिया पेज देखील समोर आले आहेत. पाकिस्तानमधील या पार्टीला देखील अनेकांनी फॉलो केलं आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाई झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं, त्यानंतर या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतामध्ये क्रॉकोच जनता पार्टीची स्थापना झाली. मराठी तरुण असलेल्या अभिजित दिपके यांनी या कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली.

या पक्षाला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल असं अभिजित दिपके यांनी कधी विचारही केला नव्हता, मात्र या पार्टीला सध्या तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे ही पार्टी सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान अभिजित दिपके यांच्या काकांनी या पार्टीबद्दल बोलताना सांगितलं की, ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या पक्षाच्या मोठा विजय झाला आणि ते मुख्यमंत्री झाले त्याचप्रमाणे अभिजित दिपके यांचं देखील स्वप्न आहे.

ट्विटर अकाउंट संस्पेंड

दरम्यान अवघ्या पाचच दिवसांमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या ट्विटर अकाउंटला तब्बल 1,60,000 जणांनी फॉलो केलं होतं. मात्र त्यानंतर गुरुवारी हे ट्विटर अकाउंट संस्पेड करण्यात आलं आहे. याबाबत अभिजित दिपके यांनी पोस्ट करत स्वत: माहिती दिली आहे, अपेक्षप्रमाणे भारतात ट्विटर अकाउंट संस्पेड झालं असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us