AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

lakshadweep Tourism | पंगा महाग पडला, लोक मालदीव विसरले, ‘या’ महिन्यापर्यंतच लक्षद्वीपच बुकिंग फुल

lakshadweep Tourism | लोक आता मालदीवसोडून लक्षद्वीप फिरण्याच प्लान बनवतायत. ट्रॅव्हल कंपनी आणि पोर्टलवर लक्षद्वीप सर्वाधिक ट्रेंड होणारा कीवर्ड बनलाय. 200% लोक लक्षद्वीपबद्दल सर्च करतायत. नेमक लक्षद्वीपबद्द लोक काय सर्च करतायत?

lakshadweep Tourism | पंगा महाग पडला, लोक मालदीव विसरले, 'या' महिन्यापर्यंतच लक्षद्वीपच बुकिंग फुल
यासाठी आयडी प्रूफ म्हणजेच आधार कार्ड, वोटर आयडी इत्यादी, ट्रॅव्हल प्रूफ म्हणून फ्लाइट तिकिट किंवा बोट बुकिंग तिकिट, हॉटेल बुकिंग कन्फर्मेशन, पासपोर्ट साइज फोटो आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ही कागदपत्रे लागतात. Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 11, 2024 | 12:03 PM
Share

lakshadweep Tourism | कधीकाळी लोकांच्या फिरण्याच्या फेवरेट लिस्टमध्ये मालदीव टॉपवर होतं. पण आता मालदीवला भारताशी पंगा महाग पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे भारतात मालदीवबद्दल प्रचंड संतापाची भावना आहे. त्याचा फटका मालदीवच्या पर्यटन उद्योगाला बसला आहे. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. त्यानंतर भारतात बॉयकॉट मालदीवचा ट्रेंड सुरु झाला. आता प्रत्यक्ष त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. भारतातील काही ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवची फ्लाइट बुकिंग रद्द केली. आता भारतीयांनी सुद्धा मालदीवला प्रत्यक्ष आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लक्षद्वीपचा दौरा केला. त्यांनी मालदीवच्या सुंदर समुद्र किनाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली. भारताला डिवचणाऱ्या मालदीवला याची किंमत चुकवावी लागत आहे.

लोक आता मालदीव सोडून लक्षद्वीप फिरण्याच प्लानिंग करतायत. लक्षद्वीपची मार्च पर्यंतची सर्व तिकिट बुक झाली आहेत. ट्रॅव्हल कंपनी आणि पोर्टलवर लक्षद्वीप सर्वाधिक ट्रेंड होणारा कीवर्ड बनलाय. 200% लोक लक्षद्वीपबद्दल सर्च करतायत. लक्षद्वीपसाठी स्वस्त प्लान्स शोधण्यासह फिरण्यासाठी कुठले बीच आहेत? ते सर्च केलं जातय.

मालदीवला दर आठवड्याला किती विमान जातात?

मालदीवला दर आठवड्याला देशातील वेगवेगळ्या शहरातून 60 विमान जातात. पण लक्षद्वीपसाठी रोज एकच विमान आहे. या विमानाची मार्च पर्यंतची सर्व तिकीट आताच बुक झाली आहेत. सरकारी एयरलाइन कंपनी अलायंस एयर या रुटवर 70 सीटर टर्बोप्रॉप एटीआर-72 एयरक्राफ्ट ऑपरेट करत आहे. डिमांड वाढल्यानंतर कंपनी आता लक्षद्वीपसाठी विमानांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे.

लक्षद्वीपसाठी हे परमिट हवं

भारतीय पर्यटकांना लक्षद्वीपला जाण्यासाठी एंट्री परमिट घ्याव लागतं. आधी बँकेत जाऊन 200 रुपये जमा करावे लागतात. त्यानंतर चालान जमा कराव लागतं. आता ही प्रोसेस ऑनलाइन केली आहे. एक-दोन दिवसात परमिट मिळतय. त्यासाठी तुम्हाला काही फी द्यावी लागते.

लक्षद्वीपसाठी फि किती?

लक्षद्वीप परमिटसाठी अर्ज करत असाल, तर फी किती आहे? त्या बद्दलही जाणून घ्या. रिपोर्ट्सनुसार, प्रति आवेदक आवेदन शुल्क 50 रुपये आहे. 12 से 18 वर्षाच्या मुलांसाठी 100 रुपये आणि एखादी व्यक्ती 18 वर्षाच्या पुढे असेल तर 200 रुपये चार्ज केले जातात.

मालदीव बरोबरच्या वादानंतर ज्या लोकांनी भविष्यात मालदीवला जाण्याचा प्लान केला होता, त्यांनी आपली तिकिट रद्द केली आहेत. दुसऱ्या ठिकाणी फिरण्याचा प्लान बनवलाय.

हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.