
भारताने आज मध्यरात्री पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला. 1.05 ते 1.30 अशी 25 मिनिटं ही कारवाई चाललेली. भारताने बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, लष्कर कॅम्प सवाई, बिलाल कॅम्प, कोटली, बरनाल कॅम्प, सरजाल कॅम्प, मेहमूना कॅम्प पाकिस्तान आणि POK मधील हे नऊ दहशतवादी तळ उडवण्यात आले आहेत. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानातील दहशवादात इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट झालं आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 जण या हल्ल्यात मारले गेले आहेत. पाकिस्तानसाठी भारताची ही कारवाई म्हणजे एक मोठा झटका आहे. कारण भारताने याआधी 2016 साली सर्जिकल स्ट्राइक त्यानंतर 2019 साली एअर स्ट्राइक केला होता. ही कारवाई मर्यादीत स्वरुपाची होती. पण यावेळी भारताने थेट नऊ ठिकाणांना टार्गेट केलय.
महत्त्वाच म्हणजे या कारवाईत दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडसह त्यांना जिथे प्रशिक्षित केलं जातं, दहशतवादी संघटनांची मुख्यालय नष्ट केली आहेत. याआधी इतकी मोठी कारवाई कधी झाली नव्हती. भारताच्या या हल्ल्याला पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. या Action नंतर मित्र देश रशियाने आता भारताला एक सल्ला दिला आहे. रशियाने भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
काय अपेक्षा व्यक्त केलीय?
भारताने पाकिस्तानात एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात सीमेवर तोफ गोळ्यांचा मारा करण्यात आला. यात भारताच्या बाजूला काही नागरिकांचा मृत्यू झाला. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. रशियाने चिंता व्यक्त केली आहे. स्थिती आणखी बिघडू नये, यासाठी रशियाने दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याच आवाहन केलं आहे. शांततामय आणि डिप्लोमॅटिक मार्गाने हा तणाव निवळेल अशी अपेक्षा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली.