मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर 24 तासांच्या आतच पाकिस्तानला मोठा दणका; पाकमध्ये भीतीचं वातावरण
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे, समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यातील मृतांमध्ये दोन विदेशी पर्यटकांचा देखील समावेश आहे,

22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे, समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यातील मृतांमध्ये दोन विदेशी पर्यटकांचा देखील समावेश आहे, मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. या हल्ल्यानंतर देशभरातली प्रमुख शहरांमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे.
दरम्यान पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण दिसून येत आहे. याचा परिणाम हा पाकिस्तानच्या शेअर मार्केटवर देखील झाला आहे, या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर कारवाई करू शकतो, अशी भीती येथील नागरिकांना आणि गुंतवणूकदारांना आहे. त्याचा परिणाम येथील शेअर मार्केटवर झाला असून, शेअर मार्केट कोसळलं आहे. मात्र दुसरीकडे भारताच्या शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना आम्ही भारतासोबत असल्याचं म्हटलं आहे.
त्यामुळे पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला आहे. पाकिस्तानचा शेअर बाजार तब्बल 1000 हजार अंकानं कोसळला आहे. तर दुसरीकडे मात्र भारती शेअर बाजारात पाचशे अंकांची उसळी दिसून येत आहे. पाकिस्तानचा शेअर बाजार 1000 अंकानी कोसळून 1,17,440 अंकावर बंद झाला. अर्थतज्ज्ञांच्या मते आता पुढील काही दिवस पाकिस्तानच्या शेअर बाजारात आणखी घसरण पाहायला मिळू शकते. दुसरीकडे या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून भारताला पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे. लवकरच या संदर्भात भारत सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
जम्मू काश्मीरमध्ये बंद
दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी आज जम्मू काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये आज संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन राबवलं जात असून, देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
