Agneepath Scheme: भारतीय लष्कराची अधिसूचना जारी, अग्निवीर भरतीसाठी जुलैपासून नोंदणीला सुरुवात

| Updated on: Jun 20, 2022 | 2:09 PM

भारतीय लष्कराने आवश्यक अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेनुसार, जुलैमध्ये नोंदणीला सुरुवात होणार आहे.

Agneepath Scheme: भारतीय लष्कराची अधिसूचना जारी, अग्निवीर भरतीसाठी जुलैपासून नोंदणीला सुरुवात
अग्निवीर भरतीसाठी जुलैपासून नोंदणीला सुरुवात
Image Credit source: social
Follow us on

अग्निवीर भरती: यापुढे भारतीय लष्करात भरती अग्निपथ योजनेतूनच (Agneepath Scheme) होणार आहे असं काल संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. अग्निपथ योजनेवरून सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. या आंदोलनाला विरोध देखील सुरु आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी हाती येतीये. अग्निपथ योजनेला विरोध होत असतानाच यादरम्यान, भारतीय लष्कराने (Indian Army) आवश्यक अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेनुसार, जुलैमध्ये नोंदणीला (Registration Process For Agneepath Scheme) सुरुवात होणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.

एक कोटी रुपयांची नुकसान भरपाईही दिली जाईल

काल संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली ज्यात त्यांनी लष्करात भरती होताना अग्निपथ योजनेअंतर्गत केली जाईल असं स्पष्टीकरण दिलंय. पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या. सध्या सेवेत असलेल्या नियमित सैनिकांना लागू असलेल्या सियाचीन आणि इतर भागातही ‘अग्निवीरां’ना हाच भत्ता मिळणार असून जवान शहीद झाल्यास एक कोटी रुपयांची नुकसान भरपाईही दिली जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

भारत बंदच्या इशाऱ्यानंतर यंत्रणा अत्यंत दक्ष

अग्निपथ योजनेवरून काही संघटनांनी भारत बंदची घोषणा केलये. या घोषणेमुळे आरपीएफ आणि जीआरपी हाय अलर्टवर आहेत. योजनेविरोधात देशातील काही भागातून विरोध करण्यात येतोय, आंदोलनं करण्यात येतायत. काही ठिकाणी हिंसक घटना देखील घडलेल्या आहेत.आंदोलकांनी सर्वात जास्त नुकसान रेल्वेचं केलंय. आता आज भारत बंदच्या इशाऱ्यानंतर यंत्रणा अत्यंत दक्ष आहेत. इतकंच काय तर विरोध करताना जर हिंसाचार झाला तर हिंसाचार कारण्याऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.हिंसाचार करणाऱ्यांवर बयोनेट कलमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. कारवाई करण्यासाठी डिजिटल पुरावे गोळा करण्याचे देखील आदेश देण्यात आलेत.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचे पुरावे वापरले जातील

हिंसाचाराच्या प्रकरणांची बारकाईने चौकशी केली जाईल, कायदेशीर कारवाई अडकणार नाही किंवा वळवली जाणार नाही, असे आरपीएफने म्हटले आहे. गुन्हेगारी कृत्यात सहभागी असलेल्या प्रत्येक आरोपीची ओळख पटवली जाईल. यात ज्यांनी हिंसाचाराचा कट रचला असेल किंवा लोकांना भडकवले असेल अशा सर्वांचा समावेश असेल. या प्रकरणांचा तपास करण्यासाठी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या पुराव्यांचा वापर केला जाईल.