ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: मिशेलने राहुल, सोनियांचं नाव घेतल्याचा ED चा दावा

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: मिशेलने राहुल, सोनियांचं नाव घेतल्याचा ED चा दावा

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणातील कथित मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेलची रवानगी 7 दिवसांच्या ईडी कोठडीत करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने शनिवारी पटियाला हाऊस कोर्टात केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली. मिशेलने चौकशीदरम्यान काँग्रेसच्य माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांची नावं घेतल्याचा दावा केला. कोर्टाने मिशेलला 7 दिवसांच्या ईडी कोर्टात धाडलं […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणातील कथित मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेलची रवानगी 7 दिवसांच्या ईडी कोठडीत करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने शनिवारी पटियाला हाऊस कोर्टात केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली. मिशेलने चौकशीदरम्यान काँग्रेसच्य माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांची नावं घेतल्याचा दावा केला.

कोर्टाने मिशेलला 7 दिवसांच्या ईडी कोर्टात धाडलं आहे. ईडीने कोर्टाकडे मिशेलची 8 दिवसांची कोठडी मागितली होती. ख्रिश्चियन मिशेल  आणि इतरांमध्ये झालेल्या संवादात, ‘एक मोठा माणूस’ असा उल्लेख करण्यात आला आणि त्यांना R वरुन संबोधण्यात येत होतं. त्यामुळे हा R नावाचा बडा माणूस कोण आहे, हे शोधावं लागेल असं ईडीने कोर्टात सांगितलं. त्यामुळेच कोर्टाने ईडीची मागणी मान्य करत, मिशेलला सात दिवसांची कोठडी सुनावली.

गांधी कुटुंबाचं नाव

दरम्यान, ईडीने केलेल्या दाव्यानुसार मिशेलने राहुल आणि सोनियांच्या नावाचा उल्लेख केला आहे. मात्र नेमकं कोणत्या प्रकरणात आणि कोणत्या कारणासाठी त्याने या नावांचा उल्लेख केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याशिवाय ईडीचा दावा आहे की मिशेल ने ‘इटलीच्या महिलेचा मुलगा’ असाही उल्लेख केला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने आरोप केला आहे की मिशेलवर सरकारी संस्था दबाव टाकत आहेत. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर कोर्टाने मिशेलला सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.

काय आहे ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा?

ऑगस्टा वेस्टलँड हा 2010 मधील कथित घोटाळा आहे. भारतीय वायू दलाने 2010 मध्ये ऑगस्टा या इटलीतील कंपनीकडून 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर 3600 कोटी रुपयात खरेदी करण्याचा करार केला होता.  करारावेळी हवाईदलाचे प्रमुख एस पी त्यागी होते, तर भारतात मनमोहन सिंह पंतप्रधान होते. या व्यवहारात कमीशन आणि लाचखोरी झाल्याचा आरोप आहे. व्यवहार व्हावा यासाठी कमीशन म्हणून 10 टक्के अर्थात जवळपास 350 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. ही लाचखोरी 2012 मध्ये समोर आली आणि 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. मात्र तोपर्यंत तीन हेलिकॉप्टर्स भारतात आले होते.

दरम्यान, इटलीतही हे लाचखोरीचं प्रकरण चांगलंच गाजलं. ऑगस्टा वेस्टलँड आणि ‘फिनमेक्कनिका’ या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी लाच दिल्याप्रकरणी इटलीतील कोर्टाने त्यांना दोषी धरलं. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या प्रमुखांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

थेट इटलीच्या कोर्टात ते सुद्धा ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या प्रमुखाला शिक्षा ठोठावल्यामुळे भारतात त्याबाबत चांगलाच गदारोळ झाला. या कंपनीच्या प्रमुखाने या व्यवहारासाठी भारतात लाच दिल्याचा आरोप आहे. मात्र कुणाला लाच दिली हे अजूनही समोर आलेलं नाही. मात्र कोर्टात सोनिया गांधींचं नाव अनेक वेळ घेण्यात आलं आहे.

बडा मासा गळाला

भारतात गदारोळ सुरु असताना ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील बडा मासा भारताच्या हाती लागला. या प्रकऱणातील मुख्य आरोपी आणि ब्रिटीश नागरिक ख्रिश्चियन मिशेलला 5 डिसेंबर 2018 रोजी दुबईतून भारतात आणण्यात आलं.  त्याचीच सध्या कसून चौकशी सुरु आहे. मिशेलने 225 कोटींची कमीशनरुपी लाच घेतल्याचा आरोप आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें