राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड? लँडिंगवेळी अडचण, लखनऊच्या विमानतळावर नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील लखनऊमधून मोठी बातमी समोर आली आहे. अमौसी विमानतळावर दिल्लीहून येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-1717 या विमानाला लँडिंगच्या काही क्षण आधी ‘गो-अराउंड’ करावे लागले. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील याच विमानातून प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे.

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड? लँडिंगवेळी अडचण, लखनऊच्या विमानतळावर नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi Plane
Image Credit source: Google
| Updated on: Sep 08, 2026 | 6:24 PM

उत्तर प्रदेशातील लखनऊमधून मोठी बातमी समोर आली आहे. अमौसी विमानतळावर दिल्लीहून येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-1717 या विमानाला लँडिंगच्या काही क्षण आधी ‘गो-अराउंड’ करावे लागले. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील याच विमानातून प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्यांदा लँडिंग करताना विमानाचा एप्रोच अस्थिर झाल्याने (Unstable Approach) पायलटने सुरक्षेच्या दृष्टीने लँडिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमान पुन्हा हवेत उंच नेण्यात आले आणि नव्या एप्रोचसाठी ते पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या प्रयत्नात विमानाचे सुरक्षित लँडिंग

पहिल्या प्रयत्नानंतर विमानाने पुन्हा लखनऊ विमानतळाच्या धावपट्टीकडे एप्रोच घेतला. दुसऱ्या प्रयत्नात AI-1717 विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. यावेळी विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील याच विमानाने दिल्लीहून लखनऊला पोहोचल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या प्रयत्नात लँडिंग यशस्वी न झाल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरल्याने परिस्थिती सामान्य झाली.

दुपारी 2:20 वाजता दिल्लीहून निघाले होते विमान

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे AI-1717 विमान दुपारी सुमारे 2:20 वाजता दिल्लीहून रवाना झाले होते. हे विमान साधारण 3:30 वाजता लखनऊला पोहोचणे अपेक्षित होते. लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नात एप्रोच अनस्टेबल असल्याने विमानाला गो-अराउंड करावे लागले. त्यानंतर दुसऱ्या एप्रोचमध्ये विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. उपलब्ध माहितीनुसार, ही घटना पायलटने अवलंबलेल्या सुरक्षा प्रक्रियेशी संबंधित होती. एप्रोच अनस्टेबल असल्यास विमानाला गो-अराउंड करणे ही सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी अवलंबली जाणारी सामान्य प्रक्रिया आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचीही घटना

एअर इंडिया एक्सप्रेसचे Boeing 737 विमान IX415 हे 7 सप्टेंबर रोजी कोचीहून अबू धाबीला जात होते. सुमारे 36 हजार फूट उंचीवर असताना विमानाच्या इंजिन-1 मधील ऑईलचे प्रमाण वेगाने कमी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पायलटने इंजिन बंद करून विमान कोचीला परत आणण्याचा निर्णय घेतला. विमानाचे कोची विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने अबू धाबीला पाठवण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us