PFI वर ED आणि NAI चा सर्जिकल स्ट्राईक! रात्रभर कंट्रोलरुममध्ये होते अजित डोवाल; कसं झाल प्लानिंग?

| Updated on: Sep 22, 2022 | 8:03 PM

या कारवाई दरम्यान एनआयएने पीएफआयशी संबंधित केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आसामसह 11 राज्यांत छापे टाकले. एनआयची ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

PFI वर ED आणि NAI चा सर्जिकल स्ट्राईक! रात्रभर कंट्रोलरुममध्ये होते अजित डोवाल; कसं झाल प्लानिंग?
Follow us on

दिल्ली : पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या विरोधात मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केले आहे. देशभरातील विविध राज्यांत पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या कार्यालयांवर ईडी आणि एनआयएने धाडी टाकल्या. या कारवाईत 106 संशयीतां ताब्यात घेण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईचा योजना आखली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रात्रभर कंट्रोलरुममध्ये होते. या कारवाईला ‘ऑपरेशन मिटनाईट’ असे नाव देण्यात आले आहे.

या कारवाई दरम्यान एनआयएने पीएफआयशी संबंधित केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आसामसह 11 राज्यांत छापे टाकले. एनआयची ही आज पर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

दहशतवाद्यांना पैसा पुरवणे आणि त्यांना प्रशिक्षण दिल्याचा संशय तपास यंत्रणांना पीएफआय या संघटनेवर होता. यामुळेच थेट धाडसत्र राबण्यात आले आहे.

एनआयएने दाखल केलेल्या एका प्रकरणात हैदराबादच्या चंद्रयानगुट्टामधील पीएफआय मुख्यालय सील करण्यात आले आहे. यानंतर पीएफआयच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करुन कारवाईचा फास आणखी आवळला जाणार आहे.

पीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ओएमएस सलाम आणि दिल्लीचे अध्यक्ष परवेझ अहमद यांना एनआयएने अटक केली आहे. यातील काहींना एनआयएच्या दिल्ली मुख्यालयात आणले जाण्याची शक्यता असल्याने एनआयए कार्यालयात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘देशभरात कारवाई सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कारवाईची माहिती जाणून घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्यासह उच्चाधिकारी उपस्थित या बैठकीला उपस्थित होते.

देशातील 11 पेक्षा जास्त ठिकाणांवर धाड टाकून 106 संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत. यासाठी 10 राज्यांच्या पोलिसांची मदत देखील घेण्यात आली.

कारवाई झालेले राज्यताब्यात घेतलेले संशयीत
महाराष्ट्र 20
केरळ22
कर्नाटक
20
आंध्र प्रदेश20
आसाम05
दिल्ली03
मध्य प्रदेश04
पुड्डुचेरी03
तामिळनाडू10
उत्तर प्रदेश08
राजस्थान02