Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यावर नांदेडमध्ये धारदार शस्राने हल्ला
नांदेडच्या माता साहिब कौर भागातील गुरुद्वारात एका निहंगने धारदार शस्राने पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर कृपाणने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

अकाली दालाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर नांदेड येथे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली असून त्यांनी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखी खाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
नांदेडच्या माता साहिब कौर भागातील गुरुद्वारात पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल आले होते. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था भेदत एका निहंगने धारदार शस्राने यांच्यावर कृपाणने हल्ला केला. या प्रकरणात घटनास्थळावरुन पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यातही घेतले आहे. नांदेडचे कलेक्टर राहुल कर्डिले यांनी सांगितले की सुखबीर सिंग बादल एका पर्सनल व्हिजिटसाठी नांदेड येथील गुरुद्वारात आले होते. त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले होते. या दरम्यान अचानक एका व्यक्तीने गुरुद्वारा परिसरात घुसून त्यांच्यावर अचानक धारदार शस्राने हल्ला केला. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात पोलिसांना देखील जखमा झाल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड येथे झालेल्या हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड पोलिस अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे. या घटनेत आरोपीला तत्काळ अटक केली असून हा हल्ला कोणत्या उद्देशाने झाला, याची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
बादल यांची प्रकृती स्थिर, आधी झाले होता हल्ला
दरम्यान, सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड येथे रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्याच येत आहे.याआधीही झाला होता हल्ला या हल्लेखोराला घटनेनंतर लागलीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. सुरक्षारक्षक एजन्सीने बादल यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सुखबीर बादल यांच्यावर याआधी देखील हल्ले झाले आहेत. ४ डिसेंबर २०२४ रोजी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या बाहेर देखील त्यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी देखील ते थोडक्यात वाचले होते.
बादल यांच्यावर हल्ला करणारा वकील
सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा 62 वर्षीय जसपालसिंग पुणे येथील रहिवासी असून तो पुणे न्यायालयात वकीली करत होता. गेल्या दोनयेथेवर्षांपासून नांदेडच्या मुगट येथील मातासाब गुरुद्वारात तो सेवा देत होता. आज सुखबीरसिंग बादल मातासाब गुरुद्वारातुन दर्शन घेऊन बाहेर पडताच त्याने त्यांच्यावर हल्ला केला. जसपालसिंग याला घटना स्थळावरुनच ताब्यात घेतले आहे. जसपाल सिंग याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.