
washington post apologizes to TV9 Bharatvarsh : टीव्ही 9 भारतवर्षची अखेर जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने माफी मागितली. या वृत्तपत्राने हे मान्य केले की, त्यांनी TV9Bharatvarsh विषयी जो दावा केला होता, तो चुकीचा होता. भारतीय माध्यम क्षेत्रासाठी हा सुवर्णदिवस म्हणावा लागेल. जगातील एका मोठ्या वृत्तपत्र समूहाने भारतातील सर्वात अग्रगण्य आणि लोकप्रिय वाहिनीची माफी मागितली. टीव्ही 9 न्यूज नेटवर्कच्या जबाबदारी पूर्ण वार्तांकनाचा हा विजय आहे. टीव्ही 9 न्यूज नेटवर्क वार्तांकन करताना बारकाईने आणि तथ्यांवर आधारीत सत्य समोर आणते, त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
अखेर माफी मागावीच लागली
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान संघर्ष उडाला होता. त्यावेळी 7 जून 2025 रोजी द वॉशिंग्टन पोस्टने भारतीय वृत्त वाहिन्यांच्या वार्तांकनावर आक्षेप घेतला. त्याविषयीचा एक लेख त्यांनी छापला. तो जगभरातील वाचकांनी वाचला. त्यात TV9 भारतवर्षचे नाव घेत हा दावा करण्यात आला की, वृत्तवाहिनी ही तथ्यांआधारे चुकीचे वार्तांकन करत आहे. द वॉशिंग्टन पोस्टच्या या तर्कहीन, तथ्यहीन, असत्य दाव्याला मग TV9 ने पुराव्यासहित उत्तर दिले. वॉशिंग्टन पोस्टला टीव्ही 9 ने कायदेशीर नोटीस पाठवली. टीव्ही 9 ने वॉशिंग्टन पोस्टला हिसका दाखवला.
मग अमेरिकन वृत्तपत्र ताळ्यावर
washington post ने मग लागलीच नांगी टाकली. या वृत्तपत्राने चूक मान्य केली आणि माफी मागितली. त्यांनी अधिकृतपणे टीव्ही 9 न्यूज नेटवर्कला एक ई-मेल पाठवला. त्यात “We regret the error” आणि TV9 भारतवर्षचे नाव या लेखातून हटवल्याचे सांगितले. हा टीव्ही 9 च्या जबाबदारीपूर्ण वार्तांकनाचा नैतिक विजय आहे.
@washingtonpost ने TV9 भारतवर्ष से माफ़ी मांगी है और स्वीकार किया है कि उनकी रिपोर्ट में @TV9Bharatvarsh को लेकर जो दावा किया गया था, वो ग़लत था.
7 जून 2025 को द वॉशिंगटन पोस्ट ने भारत-पाकिस्तान तनाव के दौरान भारतीय न्यूज़ चैनलों की रिपोर्टिंग की आलोचना करते हुए एक आर्टिकल छापा.… https://t.co/C4DVqiQwna
— Hemant Sharma (@hemantsharma360) July 29, 2025
आम्हाला पुरावे, तथ्ये, सत्याची चाड
TV9Bharatvarsh मध्ये जेव्हा आम्ही म्हणतो की, आम्हाला तुमची काळजी आहे, आम्हाला देशाची काळजी आहे. तेव्हा आपल्याला पुरावे, तथ्ये, सत्य यांची काळजी असते. आणि आपल्याला देशाची, त्याच्या प्रतिमेची, त्याच्या विचारसरणीची आणि त्याच्या धारणाची काळजी असते. बातमीची वस्तुस्थिती, सत्यतेमुळेच आम्ही आमचे काम लोकांसमोर आणि जागतिक स्तरावर दृढतेने, दृढतेने आणि प्रामाणिकपणे करतो. सत्य उघडपणे मांडणे ही आमची प्रतिज्ञा आणि वचनबद्धता आहे.