अमित शाह ठरले बंगाल विजयाचे शिल्पकार, 2016 ची ती घोषणा 2026 मध्ये विजयात बदलली
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा (TMC) भक्कम गड भाजपाने अखेर उद्धवस्त केला आहे. या विजयामागे रणनितीकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा तर आहेच मात्र, अमित शाह यांचे बुथ प्लानिंग कामी आले आहे.

Bengal Elections: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल येथील निवडणूकात भाजपाने ममता बॅनर्जी यांना धुळ चारली आहे.भाजपाला १६ वर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये यश मिळालेले आहे. देशांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुदुचेरी या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. पाच पैकी तीन राज्यात भाजपाचा विजय झाला आहे. एकूण पाच राज्यात एकूण ८२४ जागांसाठी मतदान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे कमळ फुलवल्यामागे भाजपाचे चाणक्य अमित शाह यांचे योगदान मोठे मानले जात आहे. अमित शाह यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर कशी मात केली याची चर्चा राजकीय इतिहासात नेहमीच होत राहणार आहे. आजपासून दहा वर्षांपूर्वी सोमवार, दि.२५ जानेवारी २०१६ रोजी भाजपाचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या हावडा येथील एका रॅलीत संबोधित केले होते. या दरम्यान आत्मविश्वासाने अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमित शाह यांनी ममता बॅनर्जी परिवर्तन नाही केवळ पतन केले...