बंगालमध्ये मोठमोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश, अमित शाहांचा ममता दीदींवर निशाणा, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

| Updated on: Dec 19, 2020 | 4:56 PM

अमित शाहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. आगामी निवडणूक येईपर्यंत तृणमूल काँग्रेसमध्ये फक्त ममता दीदीच राहतील, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला (Amit Shah slams Mamata Banerjee in West Bengal).

बंगालमध्ये मोठमोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश, अमित शाहांचा ममता दीदींवर निशाणा, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Follow us on

कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्यादरम्यान मेदिनीपुर येथे मोठी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बंगालचे माजी मंत्री शुभेंद्र अधिकारी यांच्यासह 11 आमदार, एक खासदार आणि एक माजी खासदार यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. या कार्यक्रमात भाषणादरम्यान अमित शाहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. आगामी निवडणूक येईपर्यंत तृणमूल काँग्रेसमध्ये फक्त ममता दीदीच राहतील, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला (Amit Shah slams Mamata Banerjee in West Bengal).

अमित शाह यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे :

1. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला कुणीही हरवू शकत नाही, असा काही मोठ्या नेत्यांचं मत आहे. मी त्यांना आठवण करुन देऊ इच्छितो लोकसभा निवडणुकीवेळी याच नेत्यांनी भाजप एकही जागा जिंकणार नाही, असं भाकीत केलं होतं. मात्र, आमचे नेते दिलीप घोष यांच्या नेतृत्वात आम्ही 18 जागा जिंकल्या.

2. भाजपमध्ये आज सामील झालेले लोक मां माटी मानुषचा नारा देत तृणमूलमधून निघाले आहेत. ममता दीदींनी मां माटी मानुषच्या घोषणेचं रुपांतर टोलेबाजीत केलं आहे (Amit Shah slams Mamata Banerjee in West Bengal).

3. शुभेंद्र भाईंच्या नेतृत्वात काँग्रेस, तृणमूल, सीपीएम पक्षातील चांगले लोक आज भाजपात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करण्यासाठी भाजपसोबत आले आहेत.

4. ममता दीदी म्हणतात, भाजप फक्त पक्षांतर करायला लावते. मी दीदींना विचारु इच्छितो, तुमचा खरा पक्ष कोणता होता? तुम्ही काँग्रेसला सोडून तृणमूलची निर्मिती केली ते काय होतं? दीदी खरंतर पक्षांतर ते होतं. आता ही सुरुवात आहे. निवडणूक येईपर्यंत शेवटी तुम्ही एकट्या राहाल.

5. आज पश्चिम बंगालमध्ये आमच्यासोबत एक खासदार, एक माजी मंत्री, एक एमओएस, 15 काउंसलर, 45 चेअरमेम आणि दोन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जोडले गेले आहेत.

6. पश्चिम बंगालच्या सर्व शेतकऱ्याचं समाधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. बंगालमधील मजुरांचं समाधान फक्त नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आहे.

7. दीदी लक्ष्यपूर्वक ऐका, यावेळी जेव्हा निकाल समोर येईल तेव्हा भाजपचा 200 जागांवर विजय असेल.

8. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या ताफ्यावर हल्ला केला. तुम्हाला वाटलं आम्ही घाबरुन जावू. तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. भाजपचे कार्यकर्ते आणखी जोमाने लोकांसाठी काम करतील. बंगालमध्ये आमच्या 300 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना मारलं गेलं. आज संपूर्ण बंगाल तुमच्या विरोधात आहे.

9. तुम्ही बंगालच्या विकासाचं वचन दिलं होतं. मात्र, तसं कधी झालंच नाही. फक्त भ्रष्टाचार आणि दादागिरी वाढली. पंतप्रधान मोदींनी अंफान चक्रीवादळग्रस्त लोकांसाठी पाठवलेले सर्व पैसे तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या खिशात गेले.

10. मी पश्चिम बंगालच्या तरुणांना विचारु इच्छितो, तुमचा काय दोष आहे? बंगालमध्ये विकास का नाही झाला? मी बंगालच्या शेतकऱ्यांना विचारु इच्छितो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पाठवण्यात येणारे वर्षाचे सहा हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत का?

हेही वाचा : सोनियांचं उद्धव ठाकरेंना पत्र, पण काय आहे त्यात? वाचा महाराष्ट्र प्रभारी काय सांगतायत?