अनंत अंबानींच्या प्री वेडिंगची पाकिस्तानमध्ये चर्चा, इतक्या पैशांमध्ये संपूर्ण पाकिस्तानातील लोकांचे तीन-चार लग्न होणार

| Updated on: Mar 05, 2024 | 9:08 AM

Anant Ambani Wedding | अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीचा समारंभ १ ते ३ मार्च दरम्यान झाला. या प्री-वेडिंग समारंभाची चर्चा भारतातच नव्हे तर जगभरात होत आहे. पाकिस्तानमधील लोकांना त्यासंदर्भात मोठे आश्चर्य वाटत आहे.

अनंत अंबानींच्या प्री वेडिंगची पाकिस्तानमध्ये चर्चा, इतक्या पैशांमध्ये संपूर्ण पाकिस्तानातील लोकांचे तीन-चार लग्न होणार
Follow us on

नवी दिल्ली | दि. 5 मार्च 2024 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानींचा लग्नपूर्वीचा समारंभ गुजरातमधील जामनगरमध्ये झाला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीचा समारंभ १ ते ३ मार्च दरम्यान तीन दिवस चालला. या समारंभास जगभरातून दिग्गज होते. बॉलीवूडमधील कलाकार आले. आंतरराष्ट्रीय सुपरस्टार रिहाना हिने गाणे म्हटले. बिल गेट्स यांनी रस्त्यावर चहा घेतली. अनंत अंबानी यांनी १६ कोटींचे घड्याळ परिधान केले. त्याचे कुतूहल फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या पत्नीला वाटले. या सर्वां गोष्टींची आता चर्चा होत आहे. परंतु पाकिस्तानात या लग्नासंदर्भात कमालीची उत्सुक्ता निर्माण झाली आहे. जगभरातील दिग्गजांचे येणे आणि एका लग्नात इतका खर्च होणे? यावर पाकिस्तानात चर्चा रंगली आहे.

लग्नाचे स्थळ तरी पाहू द्या

पाकिस्तानी युट्यूबर सना अमजद यांनी आपल्या देशातील युवकांशी अनंत अंबानीच्या लग्नाबाबत चर्चा केली. त्यावेळी हसीब चौधरी याने सनाला सांगितले, जीवनात आतापर्यंत असे लग्न पाहिले नाही. ज्या लग्नात आलेला अब्जाधीश बिल गेट्स गल्ल्यांमध्ये चहाचा स्वाद घेत आहेत. रिहाना गाणे गात आहे. मी भारताला म्हणेल, एका दिवसासाठी सीमा उघडून द्या. आम्हाला ते लग्नाचे स्थळ तरी पाहू द्या. शाहरुख खान, आमीर खान आणि खलमान खान यांचे भांडण जगजाहीर आहे. परंतु तिघे या लग्नात एकत्र येत नाचले. जे चित्रपटसृष्टीतील कोणी करु शकले नाही, ते अंबानी यांनी करुन दाखवल्याचे आणखी एका व्यक्तीने म्हटले.

पाकिस्तानमध्ये खर्चाचे कॅल्क्युलेशन

पत्रकार आरजू काजमी यांनी म्हटले की, अनंत अंबानीच्या लग्नात जितका खर्च झाला, तितक्या खर्चात पाकिस्तानातील सर्व लोकांची तीन, चार लग्न होतील. रिहाना हिला लग्नासाठी 74 कोटी रुपये दिले गेले. त्याऐवजी पाकिस्तानमधील एखाद्या गायकाला बोलवले असते तर त्याची परिस्थिती सुधारली असती.

हे सुद्धा वाचा

आमच्याकडे विष खाण्यासाठी पैसे नाही. आरजू यांनी म्हटले की, पाकिस्तानात मुकेश अंबानी यांनी 50 हजार लोकांना प्री वेडिंगमध्ये जेवण दिल्याची चांगली चर्चा रंगली आहे. या जेवणात 2800 पदार्थ होते.