धक्कादायक… अनंत सिंह यांच्या कन्येच्या लग्नात सळसळ करत आला खतरनाक साप, मंडपाजवळच… वऱ्हाडी हादरले

आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नात मंडपात अचानक साप निघाल्याने वऱ्हाड्यांमध्ये खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणाने धाडसाने सापाला पकडून बाहेर फेकल्याचे दिसते. भव्य लग्नात घडलेल्या या धक्कादायक प्रसंगामुळे सर्वांनाच धडकी भरली.

धक्कादायक... अनंत सिंह यांच्या कन्येच्या लग्नात सळसळ करत आला खतरनाक साप, मंडपाजवळच... वऱ्हाडी हादरले
Snake in wedding
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 6:24 PM

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलीचं आज लग्न लागत आहे. या लग्नाची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर तर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. अख्खा मीडिया आणि सोशल मीडिया या लग्नाची चर्चा करत आहे. 10 एकरावर होणाऱ्या या लग्नात खाण्यापिण्याचा प्रचंड बंदोबस्त करण्यात आला आहे. स्वत: आमदार अनंत सिंह रात्रभर जागून सर्व व्यवस्थेचा आढावा घेत आहे. लग्नात काही कमी पडायला नको म्हणून ते स्वत: मैदानात उतरले आहेत. मात्र, या लग्नात एक धक्कादायक घटना पाहायला मिळाली आहे.

या लग्नातील मंडपाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या लग्नाच्या मंडपात एक खतरनाक साप निघाल्याने सर्वांची तंतरली आहे. या व्हिडीओतही साप स्पष्टपणे दिसत आहे. सापाला पाहून लोक घाबरलेले दिसत आहेत. काही लोक तर घटनास्थळापासून पळ काढताना दिसत आहेत. काही उत्साही तरुण सापाची शुटिंग करताना दिसत आहेत.

Loading...

तरुण आला आणि…

साप निघाल्यावर एकच खळबळ उडाल्यानंतर एक तरुण घटनास्थळी धावत येताना दिसतोय. या तरुणाने मागे पुढे न पाहता सापाला हातात धरलं आणि तो साप बाहेर घेऊन जाताना दिसत आहे. आजूबाजूचे लोक त्याच्याकडे एकटक पाहताना दिसत आहेत.

कार्पेटवरच सळसळ

लग्नाच्या मंडपात जमिनीवर कार्पेट अंथरलेलं आहे. त्यावर हा साप रेंगळताना दिसत आहे. सापाला पाहिल्यावर तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये खळबळ उडालेलीही दिसत आहे. एक तरुण येतो. साप हातात पकडतो. बाहेर येतो आणि सापाची शेपटी गरागरा हवेत फिरवून मंडपाच्या बाहेर फेकून देताना दिसत आहे.

 

कोट्यवधीचा खर्च

या लग्नासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. एवढा मोठा खर्च केल्यानंतरही मंडपात थेट साप निघाल्याने वऱ्हाडी चांगलेच घाबरले आहेत. त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे. मात्र, व्हिडीओत हा तरुण ज्या पद्धतीने साप पकडताना दिसत आहे, त्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रीत झालेलं दिसतंय.

सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

शिवांगी सिंहच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात लग्नाचा विशाल मंडप, खाण्यापिण्याची तयारी, घोडेस्वारी आणि रितीरिवाज आदीशी संबंधित व्हिडीओ दिसत आहेत. आता सापाचा व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, या सापाला गरगरा फिरवल्यानंतर तो साप कुठे गेला याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सापाला पाहून तो पकडणं जीवावर बेतू शकतं. साप विषारी आहे की नाही हे समजत नाही. त्यामुळे अशावेळी प्रशिक्षित रेस्क्यू टीमलाच घटनास्थळी पाचारण केलं पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us