ज्योती मल्होत्राचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर, पाहा भारत सरकारबद्दल काय म्हणाली होती?

युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा तिच्यावर आरोप आहे. ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर आता तिचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

ज्योती मल्होत्राचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर, पाहा भारत सरकारबद्दल काय म्हणाली होती?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 18, 2025 | 9:35 PM

युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा तिच्यावर आरोप आहे. ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर आता तिचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा आहे. या व्हिडीओमध्ये ज्योती मल्होत्राने पहलगाम हल्ल्यासाठी भारत सरकारला जबाबदार धरलं आहे. कुठेतरी आपण या हल्ल्यासाठी जबाबदार आहोत. जम्मू काश्मीरमध्ये एवढी सुरक्षा असताना देखील असा हल्ला झाला, याचा विचार व्हायला पाहिजे असं तिने आपल्या या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

ज्योती मल्होत्राने नेमकं काय म्हटलं?

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले, या हल्ल्यानंतरचा हा ज्योती म्हल्होत्राचा व्हिडीओ आहे.या हल्ल्यासाठी तीने सरकारला जबाबदार धरलं आहे. ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर जम्मू काश्मीरमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. पर्यटकांनी देखील सावध असायला हवं. मला माहीत आहे की, जम्मू -काश्मीरमध्ये ठिक-ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो. कडक सुरक्षा व्यवस्था असते. मोठ्या प्रमाणात सुरक्षादलाचे जवान तैनात असतात. मात्र तरी देखील अशा प्रकारचा हल्ला झाला आहे. या सर्वांसाठी आपणच जबाबदार आहोत. कारण हा हल्ला आपल्या चुकीमुळे झाला आहे. आपण सतत सावध असलं पाहिजे, असं तिने म्हटलं आहे.

 

हा हल्ला झाल्यानंतर ज्योती मल्होत्रा सरकारला ज्ञान देताना दिसत आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, जर या दहशतवाद्यांना कोणी सपोर्ट करत असेल तर तो भारतीय असूच शकत नाही. दहशतवाद हा प्रत्येक देशासाठी मोठा धोका आहे. जर कोणी अजूनही त्या दहशतवाद्यांचं समर्थन करत असेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. या सर्वांसाठी कुठे नं कुठे तरी आपलं सरकार जबाबदार आहे. कारण सुरक्षेत कुठेनकुठे तरी चूक झाली आहे, ज्यामुळे हा हल्ला झाला असं ज्योती मल्होत्राने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.