
RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. संघ यावर्षी शताब्दी वर्ष साजरं करतोय. या प्रसंगी देशाच्या विभिन्न भागात कार्यक्रमाचं आयोजन केलं जातय. कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सरसंघचालक मोहन भागवत सहभागी झालेले. या प्रसंगी संघ प्रमुखांना एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारण्यात आला. RSS मध्ये मुस्लिमांना सहभागी व्हायला परवानगी आहे का? असा प्रश्न मोहन भागवत यांना विचारण्यात आला. त्यावर मोहन भागवतांनी जे उत्तर दिलं, त्यावर हॉलमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
“RSS मध्ये मुस्लिमांना सहभागी होण्याच्या अनुमतीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मोहन भागवत यांनी आपल्या अंदाजात उत्तर दिलं. संघात कुठल्याही ब्राह्मणाला वेगळी मान्यता नाहीय. कुठल्याही वेगळ्या जातीला स्वतंत्र मान्यता नाहीय. कुठल्याही मुस्लिमाला परवानगीच्या आधावर नाही. कुठल्याही ख्रिश्चनाला स्वतंत्र ओळखीसह स्वीकारलं जात नाही. केवळ हिंदू म्हणून आम्ही लोकांना स्वीकारतो. म्हणून विभिन्न समाज, धर्माचे लोक संघामध्ये येऊ शकतात. पण तुमची वेगळी ओळख बाहेर ठेवावी लागेल“ असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
“तु्मची विशेषत: स्वागतयोग्य आहे. पण जेव्हा तुम्ही शाखेमध्ये येता, तेव्हा भारत मातेचे सुपूत्र आणि हिंदू समाजाचे सदस्य म्हणून येता“ असं मोहन भागवत म्हणाले. “मुस्लिम शाखेमध्ये येतात. ख्रिश्चन येतात. तथाकथित हिंदू समाजातील अन्य जातीचे लोक सुद्धा शाखेत येतात. पण आम्ही त्यांची नोंद ठेवत नाही किंवा त्यांना हे विचारत नाही की, तु्म्ही कोण आहात?. आपण सगळे भारत मातेचे पुत्र आहोत. ही संघाच्या कार्य करण्याची पद्धत आहे“ असं मोहन भागवत म्हणाले. “भारताला पाकिस्तानसोबत शांतता हवी आहे. पण शेजारी देशाला तसं नकोय. जो पर्यंत पाकिस्तानला भारताचं नुकसान करुन काही समाधान मिळेल तो पर्यंत ते असं करत राहणार. त्यांच्याकडून वारंवार हे जे प्रयत्न होतात, त्याला जोरदार उत्तर द्यावं लागेल“ असं मोहन भागवत म्हणाले.