AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS ऑफीसची रेकी, हल्ल्याचा कट.. गुजरातमध्ये ISIS च्या दहशतवाद्यांना अटक, मोठा प्लान उघड

गुजरात एटीएसने केंद्रीय यंत्रणांसोबत संयुक्त कारवाईत अहमदाबादमधून आयसिसच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे.अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघे उत्तर प्रदेशचे आणि एक हैदराबादचा आहे.त्यांनी कुठे कुठे रेकी केली याचे तपशीलही समोर आले आहेत.

RSS ऑफीसची रेकी, हल्ल्याचा कट.. गुजरातमध्ये ISIS च्या दहशतवाद्यांना अटक, मोठा प्लान उघड
गुजरात एटीएसने अहमदाबादमधून आयसिसच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली
| Updated on: Nov 10, 2025 | 11:35 AM
Share

गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) केंद्रीय यंत्रणांसोबत संयुक्त कारवाईत काल अहमदाबादमधून आयसिसशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली. हे दहशतवादी गुजरात आणि देशभरात मोठे दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचत होते. या दहशतवाद्यांनी लखनौ आणि दिल्लीतील आझादपूर मंडी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी केल्याचेही आता उघड झाले आहे.

आझाद सुलेमान शेख, मोहम्मद सुहेल आणि अहमद मोहिउद्दीन सय्यद अशी अटक केलेल्या संशयितांची ओळख समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी लखनौमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यालय आणि दिल्लीतील गर्दी असलेल्या आझादपूर मंडीची हेरगिरी करत होते. दहशतवादी हल्ल्यांसाठी संभाव्य टार्गेट म्हणून या दोन्ही जागांची निवड झाल्याची माहिती समोर येत आहे.

कब्रस्तानात लपवली हत्यारं ?

आझाद शेख आणि सुहेल यांनी राजस्थानमधील हनुमानगड येथून शस्त्रास्त् खरेदी केली आणि गांधीनगरमधील एका कब्रस्तानात लपवली असा धक्कादायक खुलासा तपासत झाला आहे. दरम्यान, हैदराबादचा रहिवासी मोहिउद्दीन हा या शस्त्रांसह परतणार होता, परंतु गुजरात एटीएसने वेळीच कारवाई करत शुक्रवारी रात्री त्याला अटक केली. त्याच्याकडून चार परदेशी पिस्तूल, 30 काडतुसं आणि 40 लिटर एरंडेल तेलही जप्त करण्यात आले.

दहशतवाद्यांच्या मोबाईल रेकॉर्डमधून खुलासा

अटक झालेला दहशतवादी मोहिउद्दीनच्या मोबाईल फोनच्या तपासणीत त्याच्या दोन सहकाऱ्यांचे संपर्क आणि संपूर्ण मॉड्यूलच्या हालचाली उघड झाल्या. त्यानंतर, एटीएसने इतर दोन दहशतवाद्यांना अटक केली. गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांच्या सांगण्यानुसार, “डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद हा एक उच्चशिक्षित माणूस आहे, त्याने चीनमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. तो ISIS-खुरासान प्रांताचा सदस्य अबू खादिम याच्या संपर्कात होता. त्यानेच त्याला निधी उभारण्याचे आणि भारतविरोधी कारवायांसाठी भरती मोहीम चालवण्याचे काम दिले होते” अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मोहियुद्दीन बनवत होता विषारी पदार्थ

अटक करण्यात आलेला मोहिउद्दीन हा सायनाइडपासून विषारी पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करत होता अशी माहितीही पोलिसांसमोर उघड झाली आहे. ही शस्त्रं कशी पुरवली गेली आणि या नेटवर्कशी संबंधित इतर स्लीपर सेल कुठे सक्रिय आहेत याचा एटीएसकडून तपास सुरू आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.