CDS Bipin Rawat Funeral Updates : सीडीएस जनरल बिपिन रावत पंचतत्वात विलीन, मोठ्या मुलीने दिला मुखाग्नी

MI 17 V5 Chopper Crash India : तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून आज अंत्यंसस्कार करण्यात येणार आहेत.

CDS Bipin Rawat Funeral Updates :  सीडीएस जनरल बिपिन रावत पंचतत्वात विलीन, मोठ्या मुलीने दिला मुखाग्नी
Bipin Rawat Funeral
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 6:06 PM

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) बुधवारी  कोसळलं. या दुर्घटनेत देशाचे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.  बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात दुर्घटनाग्रस्त झाले. बिपीन रावत आणि इतर अधिकाऱ्यांचं पार्थिव गुरुवारी सांयकाळी दिल्लीला आणण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बड्या नेत्यांनी काल दुर्घटनेत शहीद झालेल्या अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली. आज बिपीन रावत यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात आले. रावत यांच्या मोठ्या मुलीने मुखाग्नी दिला.

हेही वाचा

Army Chopper Crash: तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बड्या लष्करी अधिकाऱ्यांसह बिपीन रावतही जखमी?

Tamil Nadu Helicopter Crash : देशातले पहिले सीडीएस बिपीन रावत, वाचा सविस्तर…

VIDEO : Breaking | तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत असल्याची माहिती

Army Helicopter crash news | लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, तामिळनाडूतील घटनेत 4 जणांचे मृतदेह हाती