सुपरहिरोप्रमाणे या व्यक्तीने केली मदत, पहलगाम हल्ल्यातून वाचवले ४० जणांचे प्राण

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जण ठार झाले आणि अनेक जखमी झाले. सॉफ्टवेअर इंजिनीअर प्रसन्ना कुमार भट यांनी पहलगाममधील अनुभव सांगितला आहे.

सुपरहिरोप्रमाणे या व्यक्तीने केली मदत, पहलगाम हल्ल्यातून वाचवले ४० जणांचे प्राण
Pehelgam Attack
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 26, 2025 | 8:11 PM

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 लोकांचा बळी गेला आणि अनेक जण जखमी झाले. हल्ल्यातून बचावलेले लोक आपल्या कहाण्या सांगत आहेत. यापैकी एक कहाणी आहे सॉफ्टवेअर इंजिनीअरची. त्यांनी सोशल मीडिया साइट X वर आपली कहाणी शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दहशतवादी हल्ल्याची भयावहता सांगितलं की, त्यांचं कुटुंब त्या दुर्दैवी दिवशी कसं थोडक्यात बचावलं.

प्रसन्ना यांचा असा दावा केला की, त्यांचा भाऊ लष्करी अधिकारी आहे त्याने सुमारे 40 लोकांचे प्राण वाचवले. प्रसन्ना कुमार भट यांनी X वर लिहिलं, “पहलगामच्या प्रसिद्ध बैसरन खोऱ्यातून आणखी एक जिवंत बचावाची कहाणी. आम्ही त्या भयावहतेतून बचावलो, जी केवळ राक्षसी कृत्य म्हणून वर्णन करता येईल आणि स्वर्गीय सौंदर्याला रक्तलाल रंगात रंगवेल. देवाची कृपा, नशीब आणि एका लष्करी अधिकाऱ्याच्या त्वरित विचाराने आमचं आयुष्य तर वाचवलंच, पण त्या दिवशी 35-40 इतर लोकांचेही प्राण वाचवले.”

वाचा: भारत खरोखर पाकिस्तानात वाहणाऱ्या सिंधू नदीचे पाणी थांबवू शकतो का?

‘प्रत्येकजण काय झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता’

प्रसन्ना यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, पहिल्या दोन गोळ्यांचा आवाज ऐकताच भयाण शांतता पसरली कारण प्रत्येकजण काय झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. काही क्षणांतच त्यांच्या कुटुंबाने दोन मृतदेह पाहिले आणि त्यांच्या भावाला तात्काळ समजलं की हा दहशतवादी हल्ला आहे. त्यानंतर सगळे घाबरून कुंपणाच्या मैदानाच्या प्रवेशद्वाराकडे धावू लागले.

त्यांनी पुढे लिहिलं, “बहुतेक गर्दी गेटच्या दिशेने धावली, जिथे आधीपासूनच दहशतवादी वाट पाहत होते. जणू मेंढरं वाघाकडे धावत आहेत. आम्ही पाहिलं की एक दहशतवादी आमच्या दिशेने येत आहे. म्हणून आम्ही दुसऱ्या दिशेने पळण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने आम्हाला कुंपणाखाली एक अरुंद रस्ता मिळाला आणि बहुतेक लोक या दुसऱ्या दिशेने पळू लागले.”

पळताना घसरत होते लोक

भट यांनी पुढे सांगितलं, “त्यांच्या भावाने त्वरित परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यांच्या कुटुंबासह 35-40 पर्यटकांना उलट्या दिशेने पळण्याचे मार्गदर्शन केले. त्यांच्या भावाने लोकांना खालच्या दिशेने पळण्याचं मार्गदर्शन केलं जेणेकरून गोळीबार होत असलेल्या ठिकाणापासून दूर जाता येईल. ही एक उतरण होती जिथे पाण्याचा प्रवाह वाहत होता, त्यामुळे ती काही प्रमाणात थेट दृष्टीपासून संरक्षण देत होती. चिखलाच्या उतारावर धावणं खूप निसरडं होतं, पण अनेक लोक जीव वाचवण्यासाठी घसरत असतानाही पळत होते”

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “आम्ही एक तास खड्ड्यात बसलो होतो. घाबरलेले, निराश आणि सुरक्षेसाठी प्रार्थना करत होतो. आम्हाला माहित नव्हतं की आम्ही तिथेच थांबावं की अज्ञात दिशेने पळावं. या दरम्यान आम्ही आमच्या लहान मुलांबद्दल आणि पालकांबद्दल विचार करत होतो, ज्यांना आम्ही घरी सोडलं होतं आणि हे कधी संपेल हे माहित नव्हतं.”

त्यांनी शेवटी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “ही एक अशी आठवण बनली आहे जी आयुष्यात कधीही पुसली जाऊ शकत नाही. आपल्या देशात असं घडतंय हे पाहणं वेदनादायक आहे. मी प्रार्थना करतो की कोणालाही आपल्या आयुष्यात अशा दहशतीचा अनुभव घेता येऊ नये. आम्ही शहीदांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना करतो आणि मला आशा आहे की देव त्यांना न्याय देईल. शेवटी मी माझ्या भावाचा आणि संपूर्ण भारतीय लष्कराचा आभार मानू इच्छितो, ज्यांच्यामुळे आमचे प्राण वाचले.”