घरातच नोटांचा डोंगर… 90 लाख कॅश, 1 कोटींचं सोनं आणि… ती अधिकारी निघाली कुबेर ! पैसे मोजता मोजता अधिकारीच दमले…

सिव्हिल सर्व्हिसेसमधील एका महिला अधिकारी प्रचंड खजिन्याची मालक असल्याचे उघड झाले आहे. नुपूर बोरा ही 2019 च्या बॅचची सिव्हिल सर्व्हिसेस (एसीएस) अधिकारी आहे. तिने आतापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे.

घरातच नोटांचा डोंगर... 90 लाख कॅश, 1 कोटींचं सोनं आणि... ती अधिकारी निघाली कुबेर ! पैसे मोजता मोजता अधिकारीच दमले...
Nupur Bora
Image Credit source: social media
| Updated on: Sep 16, 2025 | 1:35 PM

सरकारी अधिकारी का बनायचं आहे ? असा प्रश्न विचारल्यावर, देशाची सेवा करायची आहे असं सरधोपट उत्तर नेहमी दिलं जातं. सरकारी अधिकाऱ्यांच्या, विशेषतः नागरी सेवांच्या मुलाखतींमध्ये हा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि हेच उत्तर थोड्याबहुत फरकाने मिळतं. पण खरोखर किती अधिकारी ते (सेवा)  करू शकतात, करून दाखवतात ? सध्या समोर येणाऱ्या बातम्या पाहिल्य तर किती सरकारी अधीकारी हे देशाची सेवा करतात आणि किती जण पैसे कमावण्यात व्यस्त असतात, हे सहज दिसू शकेल.

असाच प्रकार आसाममधून समोर आला आहे, तिथल्या नुपूर शर्मा या महिला अधिकाऱ्याकडे चक्क कुबेराचा खजिना सापडला आहे. आसाम सिव्हिल सर्व्हिसेस (एसीएस) अधिकारी नुपूर बोरा हिच्याकडे घबाड मिळालं आहे.  आसाम पोलिसांच्या मुख्यमंत्र्यांच्या दक्षता पथकाने सोमवारी तिच्या अधिकृत निवासस्थानातून कोट्यवधींची बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली होती. लाखोंची कॅश, करोडोंच्या किमतीचे दागिने आणि बरंच काही.. समोरचं दृश्य पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारले.

2019 च्या बॅचची आसाम सिव्हिल सर्व्हिस सर्कल ऑफिसर नुपूर हिच्यावर वर बेकायदेशीर कारवायांचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून तिच्यावर नजर ठेवण्यात येत होती. अखेर सोमवारी तिच्या घरावर छापा टाकण्यात आला, त्यात 2 कोटी रुपयांपर्यंतची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यामध्ये सुमारे 90 लाख रुपये रोख आणि 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 2 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. एका साधारण सरकारी ऑफीसरच्या घरी एवढे पैसे, मालमत्ता पाहून व्हिजिलन्स टीमही हैराण झाली.

6 महिन्यांपासून रडारवर

नुपूर बोरा हिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून देखरेख, नजर ठेवण्यात येत होती असा खुलासा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी माध्यमांशी बोलताना केला. बारपेटा जिल्ह्यातील सर्कल ऑफीसर म्हणून काम करत असतना त्या कार्यकाळात नुपूर ही त्या संशयास्पद लोकांकडून पैसे घेऊन बेकायदेशीरपणे सेटलमेंट करत होत्या असा आरोप आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना मुख्यमंत्र्यांनी ‘मियां’ म्हटले होते.

नुपूर हिच्या घरी सोमवारी छापा मारण्यात आला, मात्र त्याआधी तो रविवारी टाकण्यात येणार होता. पण तेव्हा नुपूर घरी नव्हती आणि कथितरित्या एका गेस्टहाऊसवर होती, म्हणून तो (छापा) रद्द करण्यात आला. अखेर सोमवारी ती तिच्या घरी परतल्यावर टीमने थापा टाकला. गुवाहाटी येथील तिच्या निवासस्थानावर छापे टाकण्यास सुरुवात झाली आणि नंतर नुपूरशी संबंधित इतर तीन ठिकाणीदेखील छापे टाकण्यात आले. त्या अधिकाऱ्यांनी नुपूरत्या कारनाम्यांची पूर्ण कल्पना होती,ते अनेक महिन्यांपासून तिच्यावर नजर ठेवून होते, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

रेट कार्डही ठरलं होतं

शिवसागरचे आमदार अखिल गोगोई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक कार्यकर्ते गट कृषक मुक्ती संग्राम समिती (KMSS) यांनी अधिकारी नुपूरविरोधात औपचारिक तक्रार दाखल केली. तिने जमिनीशी संबंधित विविध सेवांसाठी तपशीलवार “रेट कार्ड” ठेवले होते असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे . तक्रारीनुसार, जमिनीच्या नकाशासाठी 1,500 रुपयांपासू ते जमिनीच्या नोंदींमध्ये नाव जोडण्यासाठी किंवा वगळण्यासाठी 2 लाख रुपयांर्यंत लाचेची रक्कम होती.

आणखी अनेक गुपितं

नुपूरचे घर आणि इतर ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या सीएम व्हिजिलन्सच्या एसपी रोझी कलिता यांनी या कबुली दिली की नुपूरवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. तिच्या घरून व इतर ठिकाणांहून केलेली रोकड आणि दागिने ही प्राथमिक कारवाईचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे आणि पुरावे हाती येऊ शकतात असेही त्या म्हणाल्या.