अमिताभ माझ्या विरोधात लढले तर मी रेखाला… माजी पंतप्रधानांनी दिलं होतं मजेदार उत्तर? व्हिडिओ होतोय व्हायरल
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ते अमिताभ बच्चन यांच्या राजकारणातील प्रवेश आणि बोफोर्स घोटाळ्यावर बोलताना दिसतात. वाजपेयींनी उपरोधिकपणे म्हटले होते की, जर अमिताभ त्यांच्या विरोधात लढले तर ते रेखाला त्यांच्या पक्षातून निवडणूक लढण्यास सांगतील. त्यांचा हा हजरजबाबीपणा आणि मजेदार उत्तर पुन्हा चर्चेत आले आहे.

तर मी रेखाला प्रार्थना करेन की तू माझ्याकडून निवडणूक लढ… हा एखाद्या सिनेमातील डायलॉग नाहीये. किंवा नाटकातील संवाद नाहीये. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हे विधान केलं होतं. वाजपेयी हे अत्यंत हजरजबाबी होते. त्यांचं टायमिगं अचूक होतं. त्यामुळे भल्या भल्यांची त्यांच्यासमोर बोलती बंद व्हायची. 1987 मध्ये राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला होता. 1984 मध्ये अलहाबादमध्ये प्रचंड विजय मिळवल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन संसदेत पोहोचले होते. पण काही महिन्यातच त्यांचं नाव बोफोर्स घोटाळ्यात आलं. त्यामुळे देशभर खळबळ उडाली होती. त्यांच्यावर एवढा दबाव वाढला की त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांची एक मुलाखत झाली होती. त्यांना अमिताभ बच्चन यांच्याबाबतचा सवाल करण्यात आला होता. त्यावर वाजपेयींनी चांगलाच टोला लगावला होता. अमिताभचा भाऊ चांगला सेट झालेला धंदा सोडून स्विट्जरलँडला का गेला? शाळेसाठीची महागडी फी कुठून येते? काहीच स्पष्ट उत्तर नाहीये. कदाचित पंतप्रधानांना वाचवण्यासाठी अमिताभ यांनी राजीनामा दिला असेल, असं वाजपेयी म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री रेखाचं नाव घेऊन टोला लगावला. एक्टर्ससोबत मैत्री ठीक आहे. पण मैत्रीमुळे राजकारण खराब करणं योग्य नाही, असा चिमटा वाजपेयींनी काढला होता.
तेवढेच तिखट प्रश्न विचारू
1984 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढून अमिताभ संसदेत पोहोचले होते. पण 1987 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. बोफोर्स डीलमध्ये नाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. पण वाजपेयींनी या मुद्द्यावरून संसदेपासून रस्त्यापर्यंत सरकारला घेरलं होतं. राजकारणासाठी जर सेलिब्रिटीचा राजीनामा घेतला जात असेल तर आम्ही तेवढेच तिखट प्रश्नही विचारू, असं वाजपेयी म्हणाले होते.
मग मी रेखाला विनंती…
अमिताभ यांनी राजकारणात यायला नको होतं, असंही ते म्हणाले होते. काँग्रेस राजकीय नेत्यांना हरवण्यासाठी अभिनेत्यांना निवडणुकीत उतरवत आहे. अलाहाबादमध्ये बहुगुणा यांना हरवण्यासाठी अमिताभ बच्चन यांना उभं करण्यात आलं. त्या निवडणुकीत मी दिल्लीत उभा राहिलो असतो तर माझ्या विरोधात त्यांनी अमिताभ बच्चन यांना उभं केलं असतं. त्यावेळी मी निवडणूक लढलो नसतो. मीही रेखाकडे गेलो असतो आणि आमच्याकडून लढा म्हणून त्यांना विनंती केली असती, असं मजेदार उत्तर त्यांनी दिलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.