पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, बंगळुरुत कार्यक्रमास्थळाजवळ सापडली स्फोटकं, तपास यंत्रणात खळबळ

पंतप्रधान मोदी बंगळूरु येथील श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्याआधी येथील काही अंतरावर स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, बंगळुरुत कार्यक्रमास्थळाजवळ सापडली स्फोटकं, तपास यंत्रणात खळबळ
PM MODI
| Updated on: May 10, 2026 | 5:15 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगलुरु दौऱ्याच्या आधी रविवारी शहराच्या बाहेरील भागात कार्यक्रमाच्या स्थळापासून थोड्या दूर अंतरावर दोन जिलेटिन स्टीक्स जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पीएम मोदी यांच्या कार्यक्रमाच्या जवळच ही स्फोटके सापडल्यने पंतप्रधानांची सुरक्षा पाहणाऱ्या यंत्रणेसह तपास यंत्रणात मोठा हडकंप उडाला आहे. ही स्फोटके बंगळुरुच्या कागलीपुराजवळील एका आश्रमाच्याजवळ सापडली आहेत. या ठिकाणाहून तीन किलोमीटर अंतरावरील कार्यक्रमात पंतप्रधान सामील होणार होते.

सेंट्रल बंगलुरु रेंजचे डीआयजी काय म्हणाले ?

न्यूज एजन्सी एएनआयच्या मते विस्फोटक सापडल्यानंतर बंगळुरुचे सेंट्रल रेंजचे डीआयजींनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांच्या येण्याआधी सुरु असलेल्या तपासणीत हे दोन जिलेटिन स्टीक्स रविवारी सकाळी फुटपाथच्याकडेला सापडले. हे ठिकाण मुख्य कार्यक्रमाच्या स्थळापासून तीन किमी अंतरावर आहे, ज्यात पंतप्रधान सामील होणार होते.

ते पुढे म्हणाले की, ‘ही घटना होताच सुरक्षा एजन्सींनी संपूर्ण परिसराला घेरले असून बॉम्ब नाशक पथक आणि फॉरेन्सिक टीम घटना स्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.’

गुप्तचर संस्थांनी दिला होता इशारा

ही घटना गुप्तचर एजन्सीच्या वतीने संभाव्य अतिरेकी हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर एक दिवसानंतर घडली आहे. ज्यामुळे दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा एजन्सीने अनेक संवेदनशील स्थानांवरीला आपला टेहळणी वाढवली आहे. वृत्तसंस्था एजन्सी पीटीआयच्या मते एका अधिकाऱ्याने सांगितले की पोलिसांना संवेदशनशी भागात संशयित गतीविधी, बेवारस साहित्य आणि पार्क केलेल्या कारवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिस करत आहेत चौकशी

बंगलुरु पोलिसांनी या प्रकरणाला गंभीरपणे घेतले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिस आता या प्रकरणात या जिलेटिन स्टीक्स या स्थळी पोहचल्या कशा यामागे कोणाचा कट होता याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे.

श्री श्री रवि शंकर यांच्या कार्यक्रमात पोहचले पीएम

ही घटना अशावेळी समोर आली आहे जेव्हा पंतप्रधान मोदी बंगलुरु शहराच्या बाहेर आयोजित केलेल्या श्री श्री रवि शंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींग फाऊंडेशन संस्थेच्या कार्यक्रमात सामी होण्यासाठी पोहचले होते. या संस्थेला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Follow Us