Shubhanshu Shukla : गाजर हलवाही अंतराळात जाणार.. शुभांशु शुक्ला मिशनवर काय काय नेणार ?
शुभांशू शुक्ला आज, थोड्याच वेलात अंतराळात जाणार आहेत. ॲक्सिओम-4 मिशन लाँच होणार असून ते 4 अंतराळवीरांसह उड्डाण करेल. दरम्यान, शुभांशू शुक्ला या मोहिमेत त्यांच्यासोबत कोणत्या विशेष गोष्टी घेऊन जात आहेत हेही समोर आले आहे.

भारताचे शुभांशू शुक्ला आज इतिहास रचणार आहेत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन प्रवाशांना घेऊन जाणारे ॲक्सिओम-4 मिशन आज म्हणजेच 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) प्रवासासाठी रवाना होईल. येत्या काही तासांतच ॲक्सिओम मिशन -4 हे फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेटंरमधून उड्डाण करण्यास सज्ज असेल अशी घोषणा नासाने केली आहे.
ॲक्सिओम -4 मिशन हे भारतसाठी खूप खास आहे कारण कारण 1984 साली विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर, भारत आता आपला दुसरा अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे स्वप्नातील रॉकेट आज उड्डाण करणार आहे. या मिशनवर जाताना शुभांशू शर्मा हे सोबत काय विशेष गोष्टी नेणार आहेत हे समोर आलं आहे.
मिशन कधी होणार लाँच ?
भारतीय वेळेनुसार, आज थोड्याच वेळात ( दुपारी 12 वाजून 01) मिनिटांनी वाजता हे मिशन लाँच केले जाईल. या मिशनचे नेतृत्व नासाचे माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन करत आहेत. एक्स-4 टीममध्ये पोलंडचे स्लावोज उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचाही समावेश आहे.
गाजर हलवाही जाणार अंतराळात
हे मिशन 2 आठवडे चालेल. या मिशनसाठी शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या बॅगेत काही खास गोष्टी ठेवल्या आहेत, त्याच्याबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ग्रुप कॅप्टन शुक्ला म्हणतात की या मोहिमेसाठी त्यांनी केवळ आवश्यक वस्तूच त्यांच्या बॅगेत ठेवल्या नाहीत. तर मी अब्जावधी लोकांच्या हृदयातील आशा आणि स्वप्ने घेऊन जात आहे. या स्वप्नांसोबतच या बॅगेत हलवा देखील आहे. हो, गाजर हलवाच.. असं त्यांनी सांगितलंय
या अंतराळ मोहिमेसाठी खास तयार केलेल्या त्यांच्या आवडत्या काही मिठाई घेऊन जात आहेत, असं त्यांनी नमूद केलं. अतराळात खाण्यासाठी भरपूर अन्न असेल, पण मी माझ्यासोबत आंब्याचा रस, गाजराचा हलवा आणि मूग डाळ हलवा घेऊन जाणार आहे असं शुक्ला यांनी आवर्जून सांगितलं.
छोटं सॉफ्ट टॉयही नेणार सोबत
यासोबतच, शुभांशू शुक्ला या मोहिमेवर त्यांच्या एका छोट्या साथीदारालाही घेऊन जात आहेत. हा छोटासा साथीदार म्हणजे एक सॉफ्ट टॉय आहे, त्याला त्यांनी जॉय असे नाव दिले आहे. ऑनलाइन पत्रकार परिषदेत शुक्ला यांनी जॉय सर्वांना दावला – हे एक हंसाचे सॉफ्ट टॉय आहे. हे सॉफ्ट टॉय म्हणजे या एक्स-4 वरील पाचवा क्रू मेंबर असेल.
ॲक्सिओमच्या मते, जॉय एक्स-4 हे, या यान क्रूसाठी फक्त एक प्रेमळ साथीदारच नाही. प्रक्षेपणानंतर लगेचच क्रूकडून ते एक सूचक म्हणून वापरले जाईल, जेणेकरून ते सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात पोहोचले आहेत याची पुष्टी होईल.
अवघ्या पाच इंच लांबीच्या या खेळण्याबद्दल बोलताना कमांडर व्हिट्सन म्हणाले की, आपल्या सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या हंसाचे क्रू मेंबर्सच्या देशांसाठी वेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे. म्हणूनच त्याची निवड करण्यात आली. भारतात, हंस हे ज्ञान आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. पोलंडमध्ये, हंस हे पवित्रता, निष्ठेचे प्रतीक आहे, तर हंगेरीमध्ये ते निष्ठा आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. ग्रुप कॅप्टन शुक्ला म्हणाले की, भारतीय संस्कृतीत, हंस हे विद्येची देवता, सरस्वतीचे वाहन आहे.
