प्राणप्रतिष्ठेसंदर्भात वाद निर्माण करणाऱ्या शंकराचार्यांना गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी दिले सडेतोड उत्तर

Ram Mandir Inauguration | अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्व तयारी झाली आहे. त्यावेळी प्राणप्रतिष्ठेसंदर्भात वाद निर्माण करणाऱ्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी उत्तर दिले आहे. त्यासाठी देशातील प्रमुख मंदिरांची उदाहरणे दिली आहेत.

प्राणप्रतिष्ठेसंदर्भात वाद निर्माण करणाऱ्या शंकराचार्यांना गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी दिले सडेतोड उत्तर
| Updated on: Jan 21, 2024 | 9:02 AM

अयोध्या, दि.21 जानेवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठासंदर्भात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रश्न उपस्थित केले होते. कळस झाले नसताना मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता त्यांना काशीमधील आचार्य आणि ज्‍योतिषाचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी उत्तर दिले आहे. त्यासाठी त्यांनी देशातील प्रमुख मंदिरामध्ये आधी मंदिर नंतर कळस झाल्याचे उदाहरणे सांगितली आहेत. यासंदर्भात त्यांनी पत्रही लिहिले आहे. कळस नसताना मंदिरात प्राणप्रतिष्ठा करता येते. देशातील प्रमुख नऊ मंदिरांमध्ये असे झाले आहे.

काय म्हटले होते शंकराचार्यांनी

मंदिर भगवानचे शरीर तर कळस देवातांची डोळो असते, असे म्हणत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आपण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास जाणार नसल्याचे म्हटले. काम अपूर्ण असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु त्यांच्या या दाव्याला ज्‍योतिषाचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी उदाहरणासह उत्तर दिले आहे. त्यांनी पत्र लिहून देशातील प्रमुख नऊ मंदिरांची उदाहरणे दिली आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्णपणे शास्त्र समंत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही दिली उदाहरणे

रामेश्वरम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर २७७ वर्षांनंतर कळस बसवण्यात आले. रामेश्वरम मंदिरात ७८ फूट उंच कळस २००८ मध्ये बसवण्यात आला. सोमनाथ मंदिरात १९५१ मध्ये प्राणप्रतिष्ठा झाली. कळस १९६५ मध्ये बसवण्यात आला. कर्नाटकमधील शिवमोगा श्रीलक्ष्मी नृसिंह मंदिर १३ व्या शतकात तयार झाले आहे. या मंदिरात कळस २० व्या शतकात लागले. कर्नाटक मुरुदेश्वर मंदिरात आधी प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर २००८ मध्ये मंदिराचे कळस तयार झाले. केरळमधील पद्यनाथ स्वामी मंदिराची प्राणप्रतिष्ठा पाच हजार वर्षांपूर्वी झाली. कळस १७३३ तयार झाले.

नाशिकमधील दत्तात्रेय मंदिर मागील वर्षी तयार झाले. या मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. या मंदिरात आतापर्यंत कळस तयार झालेले नाही. कर्नाटकातील गोकर्ण मंदिर म्हणजेच गणेश मंदिरात अजून कळस नाही. धारवाडमधील सिद्धी विनायक मंदिरात आतापर्यंत कळस नाही. बैजनाथ धाम मंदिरात अजून काम अपूर्ण आहे. या मंदिरात अजून कळस नाही