AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेब, अकबर, बाबर यांच्याबद्दलच बोलतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज..; सुनील शेट्टी कोणावर भडकले?

आपण औरंगजेब, अकबर, बाबर, बिरबल यांच्याबद्दलच सतत का बोलतो, असा सवाल अभिनेता सुनील शेट्टीने उपस्थित केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टीने याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.

औरंगजेब, अकबर, बाबर यांच्याबद्दलच बोलतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज..; सुनील शेट्टी कोणावर भडकले?
सुनील शेट्टीImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2026 | 9:01 AM
Share

अभिनेता सुनील शेट्टीने 2025 मध्ये ‘केसरी वीर’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. गुजरातमधील सोमनाथ मंदिर वारंवार उद्ध्वस्त केल्याच्या कथेवर आधारित हा चित्रपट होता. परंतु या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे प्रदर्शनाच्या अवघ्या काही दिवसांतच हा चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टीने चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या का यशस्वी झाला नाही, याबद्दलचा खुलासा केला. हिंदी सिनेसृष्टी कोणत्या प्रकारच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर लक्ष केंद्रीत करतेय, याबद्दलही त्याने आपले विचार मांडले. ‘केसरी वीर’ हा चित्रपट बनवण्यापूर्वी सोमनाथ मंदिराचा इतिहास समजून घेण्यासाठी बरंच संशोधन करण्यात आलं होतं. परंतु योग्य वितरणाचा अभाव हा त्याचा सर्वांत मोठा दोष असल्याचं त्यांनी म्हटलंय.

“आम्ही चित्रपट बनवण्यापूर्वी बरंच संशोधन केलं होतं. परंतु दुर्दैवाने चित्रपटाचं वितरण योग्यरित्या झालं नव्हतं. डिस्ट्रीब्युशन हा एक मोठा खेळ आहे. आम्हाला थिएटरच मिळाले नाहीत. निर्मात्याने स्वत: लोकांमध्ये त्याचं वितरण केल्यामुळे खूप पैसा गमावला आणि ते काही कामी आलं नाही. या सर्व कारणांमुळे एक चांगला चित्रपट वाया गेला. आपण औरंगजेब, अकबर, बाबर, बिरबल यांच्याबद्दलच सतत का बोलतो? आपला इतिहास आपल्या संस्कृतीबद्दल सांगणारा असला पाहिजे. आपल्या चित्रपटांमध्ये वेदांबद्दल, राजपूतांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, प्रत्येक राज्यातील प्रत्येक नायकाबद्दल बोललं पाहिजे. सोमनाथ मंदिराबद्दल मी अत्यंत भावनिक आहे. कितीतरी वेळा ते उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. पण ते अजूनही उभं आहे”, असं सुनील शेट्टी म्हणाला.

याआधी अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या ‘पृथ्वीराज चौहान’ या चित्रपटाचं प्रमोशन करतानाही असंच मत व्यक्त केलं होतं. “दुर्दैवाने आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल फक्त दोन ते तीन ओळीच आहेत, परंतु आक्रमकांबद्दल बरंच काही लिहिलं गेलंय. आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या महाराजांबद्दल फारसं काही सांगितलेलं नाही. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल इतकं काही आहे की आपल्याला त्यातलं बरंच काही माहीत नाही. हे पाहून मला आश्चर्य वाटतं”, असं अक्षय म्हणाला होता.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?