AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price today : अखेर तसंच घडलं… सकाळी सकाळी पेट्रोल डिझेल.., तुमच्या शहरात असे असतील दर, करा चेक

आज 4 जुलै रोजी पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे आहेत, कोणताही बदल नाही. 1 जुलै रोजी 'नयारा' कंपनीने दरात कपात केली होती, परंतु सरकारी कंपन्यांनी अजूनही दर कमी केले नाहीत. पेट्रोलियम मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाचे दर 2-3 आठवडे स्थिर राहिल्यासच दरकपातीचा विचार केला जाईल.

Petrol Diesel Price today : अखेर तसंच घडलं… सकाळी सकाळी पेट्रोल डिझेल.., तुमच्या शहरात असे असतील दर, करा चेक
इंधनाचे दर किती ?
| Updated on: Jul 04, 2026 | 9:34 AM
Share

Petrol Diesel Price Today : गेल्या काही महिन्यात इंधनाच्या दरात मोठे बदल झाले, किमती वाढवल्याने सामान्य नागरिकांचं बजेट बिघडलं. त्यामुळे पेट्रोल- डिझेलच्या दरात बदल होतात का,याकडे सर्वांचे लक्ष असते. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही; दर पूर्वीच्याच पातळीवर कायम आहेत. यापूर्वी, 1 जुलै रोजी ‘नयारा’ (Nayara) या खाजगी कंपनीने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले होते; यात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5.30 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र असं असलं तरीही सरकारी कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एकदाही कपात केलेली नाही. विशेष म्हणजे, इल मार्केटिंग कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर करतात. पण शनिवार 4 जुलै रोजी इंधनाचे दर जैसे थे असून किमतीत कोणताही बदल झालेला नाहीये.

दरकपातीबाबत सरकारची भूमिका काय ?

ऑईल मार्केटिंग कंपन्या अजूनही अशा स्टॉकवर प्रक्रिया करत आहेत जो उच्च दरांना खरेदी केला गेला होता, असं अलीकडेच एका प्रश्नाला उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं होतं. जर कच्च्या तेलाचे दर पुढील दोन ते तीन आठवडे स्थिर राहिले, तरच दरकपातीचा मुद्दा विचारात घेण्यासारखा ठरेल, असं ते म्हणाले. नजीकच्या काळात दरांमध्ये कोणतीही कपात होणार नाही हे पेट्रोलियम मंत्र्यांच्या या प्रतिसादावरून स्पष्ट होतं.

तुमच्या शहरात पेट्रोलचे दर किती ? (Petrol Price Today)

नवी दिल्ली – 102.12 रुपये

कोलकाता – 113.51 रुपये

मुंबई – 111.21 रुपये

चेन्नई – 107.76 रुपये

गुरुग्राम – 102.97 रुपये

नॉएडा – 101.96 रुपये

बंगळुरू – 110.93 रुपये

भुवनेश्वर – 110.49 रुपये

चंदीगड – 101.54 रुपये

हैदराबाद – 115.49 रुपये

जयपुर – 113.19 रुपये

लखनऊ – 101.86 रुपये

पटना – 113.37 रुपये

तिरुअनंतपुरम् – 115.49 रुपये

डिझेलचे दर किती ? (Diesel Price Today)

नवी दिल्ली – 95.20 रुपये

कोलकाता – 99.82 रुपये

मुंबई – 97.83 रुपये

चेन्नई – 99.55 रुपये

गुरुग्राम – 95.64 रुपये

नॉएडा – 95.44 रुपये

बंगळुरू – 98.80 रुपये

भुवनेश्वर – 102.15 रुपये

चंदीगड – 89.47 रुपये

हैदराबाद – 103.82 रुपये

जयपुर – 98.25 रुपये

लखनऊ – 95.36 रुपये

पटना – 99.36 रुपये

तिरुअनंतपुरम् – 104.40 रुपये

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण (Crude Oil Price)

हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा खुली झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. युद्धाच्या काळात ज्या कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल ११० डॉलर्सच्या वर गेले होते, ते आता पुन्हा प्रति बॅरल 72 डॉलर्सच्या आसपास आले आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, युद्धादरम्यान देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चार वेळा वाढ करण्यात आली होती आणि त्यावेळी पेट्रोलचे दर प्रति लिटर 7.50 रुपयांपर्यंत वाढले होते.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु