AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शोरमा खाल्याने उलट्या आणि जुलाब, 56 जणांना विषबाधा, गरोदर महिला आणि 11 लहानग्यांचा समावेश

शहरात उघड्यावरील खाद्य पदार्थांच्या गाड्यांवरील अन्नपदार्थांना खाऊ नये असे वारंवार आवाहन करुन देखील स्वस्तात आणि जाता येता सहज खरेदी करता येते म्हणून असे पदार्थ सहज खात असतात. मात्र, आता शोरमा खाल्ल्याने अनेक जणांना विषबाधा झाली आहे.

शोरमा खाल्याने उलट्या आणि जुलाब, 56 जणांना विषबाधा, गरोदर महिला आणि 11 लहानग्यांचा समावेश
chicken shawarma food poisoning
| Edited By: | Updated on: Nov 25, 2026 | 5:49 PM
Share

भिवंडी शहरात 15 जूनच्या दरम्यान शोरमा खाल्ल्याने 107 जणांना विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी पुन्हा विषबाधेचे प्रकरण घडले आहे. लागोपाठ घडलेल्या या घटनांनी भिवंडी महानगर पालिका आणि संबंधित यंत्रणांचे धाबे दणाणले आहे. ताज्या घटनेत वंजारी नाका परिसरातील ए.के. शोरमा शॉप येथे चिकन शोरमा खाल्याने मंगळवारी दुपारनंतर अनेकांना अन्न विषबाधेचा प्रादुर्भाव जाणवू लागला.सुरवातीला एकाच कुटुंबातील चार जणांची तब्येत बिघडली. त्यांना दुपारी स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हळूहळू ही संख्या वाढत जाऊन रात्री 34 जणांना रुग्णालयात आणले, तर बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ही रुग्ण संख्या 56 वर पोहचली आहे.या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे .रुग्णांना शोरमा खाल्ल्यानंत उलटी,जुलाब आणि थंडी ताप याचा त्रास जाणवत असून त्यावर उपचार सुरू आहेत.

शहरात उघड्यावरील खाद्य पदार्थांच्या विक्रीवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. महिन्यांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने त्रास झाल्याने 107 रुग्णांना अन्न विषबाधा झाली होती.नागरिकांनी सुद्धा उघड्यावरील खाद्य पदार्थ खावू नयेत घरात शिजवलेले सकस अन्न खावे.विशेष म्हणजे एक वर्ष वयाच्या मुलाला आणि गरोदर महिलेला देखील विषबाधा झाली आहे हे गंभीर असून त्यामुळे नागरिकांनी सुद्धा खबरदारी घ्यावी असे आवाहन स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिक डॉ.माधवी पंदारे यांनी केले आहे.

रुग्णालयात दाखल झालेल्या 56 रुग्णात 27 पुरुष आहेत. १८ जण महिला आहेत. तर ११ लहान बालके. एक दोन महिन्यांची गरोदर आहे. रासायनिक विश्लेषण आणि जैव वैद्यकीय तपासणीसाठी नमूने पाठवण्यात आले. 6 ते 8 तास ते 24 तासात त्रास होऊ शकतो. शोरमात बऱ्याचदा मांस कच्चे रहाते या कच्च्या मांसात ई. कोलाय (E. coli) आणि साल्मोनेला (Salmonella) सारखे जीवाणू जिवंत राहतात.त्यामुळे ते खाणे अत्यंत धोकादायक असते. शिवाय येथे तयार केलेली लसूण चटणी आणि सॉस उघड्यावर ठेवलेले असते. त्यामुळे अस्वच्छतेनेही विषबाधा होते. शोरमामध्ये वापरले जाणारे मेयोनीज (विशेषतः कच्च्या अंड्यांपासून बनवलेले) असते. त्यातूनही विषबाधा होते.

निजामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

भिवंडी शहरातील या दुसऱ्या घटनेनंतर पालिका प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून मंगळवारी एके शोरमा या दुकानाची कॅबिन जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केली. पालिकेने शोरमा विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित केले असून कारवाई सुरू करण्यात आली आहे. तर निजामपूर पोलिसांनी शोरमा विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर यांनी तत्काळ आदेश काढून संबंधित प्रभाग समिती, परवाना विभाग, मार्केट विभाग, अतिक्रमण विभाग यांसह अन्न सुरक्षा अधिकारी आणि स्थानिक पोलिस यांच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई सुरू केली जाणार असून सायंकाळी विशेष पथकाद्वारे कारवाई सुरू केली जाणार आहे अशी माहिती पालिका उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांनी दिली आहे.

Follow Us
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...