AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gauri Spratt Net Worth : आमिर खानची होणारी तिसरी बायकोही पैशाच्या बाबतीत कुठेही कमी नाही, गडगंज संपत्तीची मालकीण

Gauri Spratt Net Worth : अभिनेता आमिर खान याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. वयाच्या 61 व्या वर्षी अभिनेता लवकरच विवावाहबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड गौरी हिच्यासोबत अभिनेता लग्न करतोय. पण त्या आधी आमिरच्या होणाऱ्या तिसऱ्या बायकोची संपत्ती समोर आली आहे.

Gauri Spratt Net Worth : आमिर खानची होणारी तिसरी बायकोही पैशाच्या बाबतीत कुठेही कमी नाही, गडगंज संपत्तीची मालकीण
Aamir Khan Gauri Spratt
| Updated on: Jul 04, 2026 | 9:49 AM
Share

Gauri Spratt Net Worth: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट हिला डेट करत आहे. 60 वाढदिवशी आमिर याने गौरी हिच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आमिर आणि गौरी लग्न करणार आहे. 5 जुलै रोजी आमिर आणि गौरी त्यांच्या नात्याला पती – पत्नीचं नाव देणार आहेत. पण त्याआधी गौरी हिच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

कोण आहे गौरी स्प्रैट?

गौरी स्प्रैट हिच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेण्यापूर्वी, तिच्याबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया. गौरी 47 वर्षांची आहे. गौरी आणि आमिर यांच्यामध्ये जवळपास 14 वर्षांचं अंतर आहे… गौरी हिचा जन्म कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरूमध्ये झाला. तिचे वडील रॉबर्ट स्प्राट हे तमिळ-ब्रिटीश वंशाचे आहेत, तर त्यांच्या आई रीटा स्प्राट या पंजाबी-आयरिश वंशाच्या आहेत.

पैशाच्या बाबतीत कुठेही कमी नाही आमिरची होणारी बायको?

आमिर खान याच्याबद्दल सांगायचं झालं, तर बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत आमिर खान अव्वल स्थानी आहे. आता गौरी हिच्या संपत्तीचा देखील अंदाजे आकडा समोर आला आहे. ‘मॅजिकब्रिक्स’च्या रिपोर्टनुसार, गौरीची एकूण संपत्ती 24 कोटी ते 40 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. लंडनमध्ये फॅशन आणि स्टाइलिंगचे शिक्षण घेतलेली गौरी ही एक उद्योजिका आणि फॅशन स्टायलिस्ट आहे. ती ‘बी:ब्लंट’ (B:Blunt) या कंपनीत संचालक आणि पार्टनर आहे. त्याचप्रमाणे, गौरी तिचा होणारा पती आमीर खान याच्या ‘आमीर खान प्रॉडक्शन्स’ (Aamir Khan Productions) या प्रॉडक्शन हाऊससोबतही काम करत असल्याचं समोर आलं आहे.

कसं होणार गौरी आणि आमिर यांचं लग्न?

खुद्द आमिर खान याने समोर येत लग्न करत असल्याचं सांगितलं आहे. 5 जुलै रोजी गौरीसोबत लग्न करणार आहे. आमिर याने सांगितल्यानुसार, अभिनेत्याच्या राहत्या घरीच साध्या पद्धतील लग्न पार पडणार आहे. लग्नात जवळचे मित्र आणि कुटुंबिय असणार आहेत. आमिरची मुलं देखील वडिलांच्या लग्नात उपस्थित राहणार आहे. गौरी हिचं देखील आधी एक लग्न झालेलं आहे. तिला सात वर्षांचा मुलगा देखील आहे, ज्याचं नाव क्वीन (Quinn) आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा