AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: PF वरील व्याजदर वाढणार? ईपीएफओच्या नियमातील बदलानंतर जोरदार चर्चा, नवीन अपडेट काय?

EPF Interest Rate: केंद्र सरकारने कामगार संहिता लागू केल्यानंतर आता EPF Scheme 2026 ची अंमलबजावणी सुरू केली आहे. ईपीएफओच्या नियमात बदल झाला आहे. त्यामुळे आता व्याजदरात वाढ होईल का, अशी जोरदार चर्चा होत आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

EPFO: PF वरील व्याजदर वाढणार? ईपीएफओच्या नियमातील बदलानंतर जोरदार चर्चा, नवीन अपडेट काय?
PF वरील व्याजदरात वाढ?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 04, 2026 | 9:21 AM
Share

EPFO New Update: केंद्र सरकारने कामगार संहिता लागू केली आहे. सोबतच सामाजिक सुरक्षा संहिता , 2020 अंतर्गत केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 2026 (EPF Scheme 2026) ची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नवीन योजनेने दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 ची जागा घेतली आहे. जुनी ईपीएफ योजना संपुष्टात आली आहे. नवीन नियम लागू झाले आहेत. ईपीएफओ (EPFO) च्या 7 कोटी कर्मचाऱ्यांना आता पीफवरील व्याजदर वाढीचा फायदा मिळेल का अशी चर्चा रंगली आहे. सध्या पीएफ खात्यात जमा होणाऱ्या रक्कमेवर 8.25 टक्के व्याजदर जाहीर करण्यात आला आहे.

नवीन ईपीएफ योजनेतंर्गत 8.25 टक्क्यांहून अधिक व्याज मिळेल?

नवीन ईपीएफ योजना लागू झाल्यानंतर पीएफवरील व्याज दरात कोणताही बदल होणार नाही. सध्या हा दर 8.25 टक्के इतका आहे. ईपीएफओकडून (EPFO) 1 जुलै 2026 रोजी याविषयीची अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यानुसार कामगार मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2025-26 साठी ईपीएफ योजनेतील पीएफ रक्कमेवर 8.25% दराने व्याज जमा करण्यास मंजूरी दिली आहे. अर्थात ही तरतूद जुनी ईपीएफ योजना, 1952 च्या निकष, नियमानुसार करण्यात आली आहे. पण सध्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही.

सामाजिक सुरक्षा संहिते अंतर्गत EPF

आता एक मोठा बदल झाला आहे. ईपीएफ योजना यापूर्वी केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध अधिनियम 1952 अंतर्गत येत होती. पण ईपीएफ योजना, 2026 ची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 (Code on Social Security 2020) अंतर्गत ईपीएफओ काम करेल. त्यामुळे पीएफ खातेदारांना सामाजिक सुरक्षा मिळेल. या बदलाचा कोणाताही नकारात्मक परिणाम खातेदारांवर होणार नाही.

डिजिटल सेवांची सुरुवात

नवीन योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे ईपीएफओ आता डिजिटल सेवा देणार आहे. कार्यलयात जाण्याची गरज भासणार नाही. पीएफ काढणे अधिक सोपे आणि सुलभ होईल. क्लेम सेटलमेंट तीन दिवसात पूर्ण होईल. तर ATM आणि युपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लवकरच पीएफ रक्कम काढता येईल. कर्मचार्‍यांना सहज पीएफ खात्यातील पैसा काढता येईल. गरजेच्या वेळी त्यांना वाट पाहावी लागणार नाही. तर ऑनलाईन फायलिंगक, पीएफ रेकॉर्ड्स, डिजिटल अकाऊंट, ऑनलाईन क्लेम सबमिशन, ई-पासबुक आणि इतर सुविधांचा श्रीगणेशा होणार आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय