AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पगार 1 लाख, पण PF 1,800 रुपयेच जमा होणार, EPFO चे नवीन नियम काय?

EPFO Rules Change: खासगी क्षेत्रातील जवळपास 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर येत आहे. EPFO ने PF नियमात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, 15,000 रुपयांपर्यंतच्या वेतनावर 12% ईपीएफ योगदान गरजेचे आहे.

पगार 1 लाख, पण PF 1,800 रुपयेच जमा होणार, EPFO चे नवीन नियम काय?
EPFO चे नवीन नियम काय?
| Updated on: Jul 03, 2026 | 12:06 PM
Share

EPFO Rules Change: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) PF नियमात मोठा बदल केला आहे. EPFO ने आता 15,000 रुपयांपर्यंतच्या वेतनावर 12 टक्के पीएफ योगदान देणे आवश्यक केले आहे. त्यानुसार, महिन्याकाठी पीएफ खात्यात 1,800 रुपये जमा होतील. तर त्यावर जी रक्कम जमा होईल ती ऐच्छिक मानली जाणार आहे. याचा अर्थ तुमचे मुळ वेतन एक लाख रुपये प्रति महिना असले तरी पीएफ खात्यात सक्तीचे केवळ 1,800 रुपये जमा होतील. त्यात तितकीच रक्कम कंपनी जमा करेल. तर कर्मचारी त्यांच्या वेतनातील काही रक्कम पीएफ खात्यात जमा करू शकतात. हा निवृत्तीसाठीची तरतूद असेल.

काय होईल फायदा?

या नवीन नियमामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीसाठी अधिक रक्कम जमा करणे सोपे होईल असा दावा करण्यात येत आहे. कामगार संहितेनुसार हा बदल करण्यात आला आहे. खासगी क्षेत्रात सॅलरी कॉस्ट टू कंपनी (CTC) मॉडल प्रचलित आहे. नवीन नियमानुसार सॅलरी स्ट्रक्चर, वेतन रचना होईल. या नवीन नियमामुळे कंपनीला ही मोठा फायदा होणार आहे.

निवृत्तीसाठी ऐच्छिक योगदानाचा पर्याय खुला

ईपीएफओनुसार, नियमानुसार आता केवळ 1,800 रुपयांचे योगदान जमा होणार असले तरी निवृत्तीनंतर मोठा निधी जमा होऊ शकतो. कर्मचाऱ्यांना निवृत्तीसाठी ऐच्छिक योगदानाचा पर्याय आहे. ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी योजना 2026 सूचित केले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम जमा करता येईल. विशेष म्हणजे कर्मचारी आणि कंपनीला ऐच्छिक योगदान केव्हा ही बंद करता येऊ शकते.

पैसे काढणे झाले सोपे

नवीन योजनेत PF खात्यातून पैसे काढणे सोपे होणार आहे. आता पीएफ काढण्यासाठी यापूर्वी 13 वेगवेगळ्या श्रेणी करण्यात आले होते. आता केवळ 3 श्रेणी असतील. यामध्ये आजारपण, शिक्षण, लग्न, घर खरेदीसाठी पैसे काढता येतील. काही विशेष प्रकरणात कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून 100 टक्के रक्कम काढू शकतात. पण इतर परिस्थितीत कमीत कमी 25% ठेव शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु