Ayodhya | अयोध्येच्या राम मंदिराचं काम कुठपर्यंत? दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन

अयोध्येच्या श्रीराम मंदिराचं बांधकाम युद्ध पातळीवर सुरु आहे. श्रीरामाच्या जन्मभूमी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील काम 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 2024 पर्यंत रामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना केली जाईल.

Ayodhya | अयोध्येच्या राम मंदिराचं काम कुठपर्यंत? दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन
अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिराचे प्रस्तावित छायाचित्रImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 6:12 AM

नवी दिल्लीः  संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी (Indian Citizens) अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Temple) हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते राम मंदिराच्या बांधकामाचे भूमीपूजन झाले होते. राम जन्मभूमीच्या भव्य परिसरात हे मंदिर बांधले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भगृहातील परिक्रमेचा मार्ग जवपास 30% पूर्ण झाला आहे. तर स्वरुप मंदिराच्या चौथऱ्याचं काम याच महिन्यात पूर्ण होणार आहे. रामलल्लांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आता मंदिराचं भव्य स्वरुप लक्षात येऊ लागलंय. जानेवारी 2024 पर्यंत रामलल्लांच्या मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अयोध्या क्षेत्राला एक आध्यात्मिक, ज्ञान आणि उत्सवाचं शहर अशा रुपात विकसित करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. येथे भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधादेखील दिल्या जाणार आहेत. 1200 एकरांच्या परिसरात हे काम सुरु असून आंतरराष्ट्रीय संस्था, विविध राज्यांचे भवन, मठ, हॉटेल्स आदींसाठी भूखंडही दिले जाणार आहेत.

गर्भगृहातील परिक्रमेचं काम प्रगतीपथावर

मागील दोन वर्षांपासून मंदिराचं काम वेगाने सुरु असून मंदिराचा पाया झआल्यानंतर आता चौथऱ्याचं काम प्रगतीपथावर आहे. शहराच्या पर्वेशाच्या सहा मार्गांवर सहा भव्य दरवाजे बांधले जाणार आहेत. प्रत्येक दाराजवळ पाच एक परिसरात सुसज्ज भक्त निवास असेल. मंदिराच्या बांधकामातील प्लिंथ तयार करण्याचं काम तीन चतुर्थांश पूर्ण झालं आहे. येत्या महिनाभरात प्लिंथ निर्मिती पूर्ण होईल. राम मंदिरातील पहिल्या मजल्याचं काम जून महिन्यातच सुरु झालंय. याच मजल्यावर गर्भगृह बांधलं जातंय. याच्या चौथ्या थराचं काम सुरु आहे. गर्भगृहाच्या परिक्रमेचा भाग पूर्ण बांधल्यानंतर गर्भगृहाच्या आतील भागाचे काम सुरु होईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे ट्रस्टी अनिल मिश्र म्हणाले, राम जन्मभूमी परिसरात मंदिर बांधकामासाठी चौथरा तयार करण्याचे काम सुरु आहे. जवळपास 21 फुट उंचीचा चौथरा ग्रेनाइट पासून बांधला जातोय. यात जवळपास 17 हजार दगड वापरले जातील. त्यापैकी 5 हजार दगड लावण्यात आले आहेत.

2023 पर्यंत पहिल्या टप्प्याचे काम

ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत प्लिंथच्या 350 बाय 250 परिसरावर ग्रेनाइटचे दगड लावण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर त्याच्या बेसवर मुख्य मंदिराचे काम सुरु होईल. 2023 पर्यंत श्रीराम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. नियोजनानुसार, योग्य वेळात सर्व काम होत राहिलं तर 2025 पर्यंत संपूर्ण मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर अयोध्येचं बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिर भाविकांसाठी खुलं होईल. मंदिराच्या इतर मजल्यांचं काम त्यानंतर सुरूच राहिल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.