
प्रभु की कृपा भयऊ सब काजु...म्हणजेच प्रभू रामाची कृपा झाल्यावर सर्व कार्य पाडतात. आज सुमारे ५०० वर्षांची प्रतिक्षा संपणार आहे. सोमवारी श्रीरामलल्ला आपल्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साधू संतांसोबत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणार आहे.

अयोध्या नगरी हजारों क्विंटल फुलांनी नववधूसारखी सजवण्यात आली आहे. फक्त अयोध्याच नव्हे तर देशभरातील मंदिरांमध्ये सजावट करण्यात आली आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, कीर्तन, राम चरित मानस पठण अन् अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहे.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिरावर विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. अयोध्यातील प्रत्येक गल्लीबोळ सजवली गेली आहे. व्हीव्हीआयपीच्या आगमनामुळे अयोध्येत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस, निमलष्करी दलाबरोबर गुप्तचर संस्थांचे अधिकारी असणार आहे.

सरयू नदी नृत्यू करत आहे. हनुमान गढीत शंखघोष सुरु आहे. अयोध्येतील आणि देशातील घराघरात दिवाळीसारखा उत्साह आहे. देशात दुसऱ्यांदा दिवाळी साजरी केली जात आहे. जय श्रीरामच्या घोषणा सर्वत्र दिल्या जात आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेंकदाचा मुहूर्त आहे. सकाळी 12:29 ते 12:30 दरम्यान प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलल्लाची स्थापना झाल्यावर महापूजा आणि महाआरती होणार आहे. यावेळी गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित असतील.