कंगनाला पोस्टाने… बाबा रामदेव यांनी रक्षा बंधनाच्या निमित्ताने चिमटा काढलाच, पुन्हा वाद भडकणार?
Baba Ramdev on Kangana Ranaut: बाबा रामदेव यांनी भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. हरिद्वारमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पुन्हा वादावर भाष्य केले. अर्थात आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी राणावत यांना एक खास संदेश दिला आहे.

हरिद्वारमध्ये एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांची मोठी आठवण काढलीच. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यात कलगीतुरा आहे. आज रक्षाबंधन आहे. त्याचवेळी रामदेव बाबा यांना कंगना यांची आठवण तर आलीच पण त्यांनी एक खास संदेशही दिला. कंगना यांना पोस्टाद्वारे एक खास गिफ्ट आणि मिठाई पाठवणार असल्याचा दावा त्यांनी केला. देशात कुणामध्येच नाहक भेदभाव नसावा. लोकांमध्ये आपआपसात कोणतेही वैर नसावे. आपण कंगनाला फोन करणार आहोत. त्यांना प्रेमाचा संदेश देणार आहोत. कोणताही वाद नाहक द्वेषात बदलता कामा नये, असे सांगणार आहोत, असा लांबलचक संदेश रामदेव बाबा यांनी दिला.
रामदेवा बाबा यांच्या या अचानक युटर्नमुळे भक्त मात्र सैरभैर झाले आहेत. बाबा आज कंगनावर अजून कटाक्ष टाकतील असे त्यांना वाटत होते. पण बाबा रामदेव यांनी आज समोचाराची नवीन ओळख करून दिली. त्यांनी वाद वादाच्या ठिकाणी, त्याचे द्वेषात रुपांतर व्हायला नको असा अध्यात्मिक संदेश देऊन कंगना यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते कंगना राणावत यांना फोन करणार आहेत आणि पोस्टाद्वारे ते मिठाई आणि खास गिफ्टही पाठवणार आहेत. आता त्यांच्या या वक्तव्यावर कंगना काय उत्तर देते याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या या दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचे समोर आले आहे.
कंगना आणि रामदेव बाबा यांच्यात टोलेबाजी
बाबा रामदेव आणि कंगना राणावत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून टोलेबाजी सुरू आहे. कंगनाने रामदेव बाबांवर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. तिने बाबांवर नाराजी व्यक्त केली होती. बाबांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केल्याचा आरोपही कंगनाने लावला होता. दोन्ही पक्षांकडून जशाच तसे उत्तर देण्यात येत होते. यातून लोकांचे चांगले मनोरंजन सुरू होते. पण आता बाबा रामदेव यांनी थोडं नमतं घेत कंगना यांच्यासोबतच्या वादावर गोडव्याचा तोडगा काढण्याचे ठरवले आहे. त्यांनी मैत्रीचा एक हात पुढे केला आहे. आता कंगना त्यावर काय उत्तर देते हे लवकरच समोर येईल.
केव्हा फुटले वादाला तोंड?
कंगना राणावत यांनी तरुणाईला संबोधित करताना जनरेशन गटर असा आपत्तीजनक शब्दाचा प्रयोग केला होता. त्यांच्या या शब्दावरून बाबा रामदेव यांनी कंगनाला फटकारले होते. त्यांनी थेट कंगनाच्या विचारांवरच प्रहार केला. कंगनाच्या मनस्थितीवरही त्यांनी सवाल केला. माझ्यावर, माझ्या चारित्र्य आणि बेडीविषयीच्या आयुष्यावर कोणताही काल्पनिक प्रतिक्रिया देऊ नका असा तिखट पलटवार कंगनाने केला होता. त्यानंतर दोघांमध्ये जो काही शिमगा पाहायला मिळाला, त्याला तोड नाही.