Baba Vanga predicts : पुढील 48 तासांत जगावर येणार सर्वात मोठ संकट? काउंटडाउन सुरू, बाबा वेंगांचं हादरवणारं भाकीत

बग्लेरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी वर्तवलेली भाकीतं नेहमीच चर्चेत असतात. त्यांची अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. आता बाबा वेंगा यांचं आणखी एक भाकीत समोर आलं आहे.

Baba Vanga predicts : पुढील 48 तासांत जगावर येणार सर्वात मोठ संकट? काउंटडाउन सुरू, बाबा वेंगांचं हादरवणारं भाकीत
| Updated on: Jul 02, 2025 | 6:11 PM

बग्लेरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी वर्तवलेली भाकीतं नेहमीच चर्चेत असतात. त्यांची अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. आता बाबा वेंगा यांचं आणखी एक भाकीत समोर आलं आहे, ज्यामुळे जगात खळबळ उडाली आहे. या भविष्यवाणीनुसार जुलै महिन्यात जगावर एक महासंकट येणार आहे, यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

बाबा वेंगा यांच्या बूक ‘ दी फ्यूचर’ मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जुलै महिन्यात महाप्रलय येणार आहे. त्यामुळे जैुल महिन्यात अनेक मोठे बदल होतील. हे सर्व बदल वातावरण, आजार आणि जागतिक राजकारणाशी संबंधित असू शकतात असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बाबा वेंगा यांचं हे देखील भाकीत खरं ठरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे, त्याचं कारण म्हणजे जपानी बाबा वेंगा यांनी देखील असंच भाकीत वर्तवलं आहे. त्यांच्या एका पुस्तकामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, येत्या पाच जुलै रोजी जपानवर महासंकट येणार आहे. जपानमध्ये त्सुनामी येईल यामुळे समुद्रात तीन पट अधिक उंचीच्या लाटा उसळतील, यामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान जपानी बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांनी तर आपलं हॉटेल आणि विमान तिकीट बुकिंग देखील रद्द केलं आहे.

2025 च्या जुलैमध्ये जगावर मोठं नैसर्गिक संकट येईल, हे संकट आग, हवा किंवा पाण्याशी संबंधित असेल असा दावा बाबा वेंगा यांनी केलं आहे. असंच भाकीत जपानी बाब वेंगानं देखील वर्तवलं आहे. त्यामुळे येत्या 5 जुलै रोजी खरच जपानमध्ये त्सुनामी येणार का? याकडे आता सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार देखील सध्या ग्रहांचा अशुभ योग सुरू आहे. मंगळ, राहू आणि केतूचा अशुभ योग आहे. अंगारक योग आहे. त्यामुळे या काळात देशसह जगभरात काही मोठ्या दुर्घटना घडू शकतात. भूकंप, ज्वालामुखी त्सुनामी अशा घटनांची शक्यता आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)