रुग्णायलात उपचार नाही तर, तंत्र-मंत्र विद्या… खोदलेल्या खड्ड्यातून असं काही समोर आलं ते, पाहून सर्वच थक्क

रुग्णालयात तंत्र-मंत्र विद्या सुरु असताना आले पोलीस.... खोदलेल्या खड्ड्यातून असं काही समोर आलं ते पाहून सर्वच थक्क, 5 जणांना अटक... जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

रुग्णायलात उपचार नाही तर, तंत्र-मंत्र विद्या... खोदलेल्या खड्ड्यातून असं काही समोर आलं ते, पाहून सर्वच थक्क
| Updated on: Apr 24, 2026 | 12:09 PM

नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कृत्य समोर आल्यानंतर देशातील अनेक भोंदू बाबांची पोलखोल झाली. जे भक्तीच्या नावाखाली अनेकांनी फसवणूक करायचे, एवढंच नाही तर, महिलांचे लैंगीक शोषण देखील करायचे आहे. आता पुन्हा तंत्र-मंत्र प्रकरणी मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. रुग्णालयात तंत्रमंत्र विद्या सुरु असल्याची माहिती समोर आली आहे… रुग्णालयाच्या जमीनीतून सोन काढू असं सांगत आरोपींनी रुग्णालयाच्या संचालकाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिसांना पाच जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तंत्र-मंत्र विद्या सुरु असताना रुग्णालयाचे संचालक आणि आरोपींमध्ये मारहाण झाली आणि ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली, अशात घटनास्थळी येऊन पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं.

मुरादाबाद येथे इतायला माफी गावचा रहिवासी असलेल्या मुनशादचं पाकबारा भागातील भादली गावात एचएनपी नावाचं एक खाजगी रुग्णालय होतं. हे रुग्णालय गेल्या 2 वर्षांपासून बंद होतं… मिळालेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांपूर्वी मुनशाद आणि झुबेर यांची भेट झाली. झुबेर याने आश्वासन दिलं की, त्याच्या सध्याच्या समस्या तांत्रिक पद्धतींनी सोडवल्या जाऊ शकतात.

सुरुवात असल्याने मुनशाद याच्याकडून 15 हजार रुपयांची मागणी केली. त्याने पैसे दिले देखील… दुसऱ्या भेटीत, याकूब आणि झुबेर यांनी निझामुद्दीन, शहजाद आणि शाहिद यांना देखील सोबत आणलं. त्यांनी मिळून मुनशादशी बोलून त्याला अडकवून ठेवलं. बुधवारी रात्री, पाचही आरोपींनी मुनशादला त्याच्या बंद असलेल्या रुग्णालयात नेलं.

बंद रुग्णालयात त्यांनी तंत्र-मंत्र करण्यासाठी सामान मागवलं… जेथे एक खड्डा तयार केला आणि त्यात काही दाबण्याची प्रक्रिया सुरु केली… त्यानंतर आरोपींनी मुनशाद याला सांगितलं की, जमीनीत सोनं आहे… जे काढण्यासाठी आणखी 20 हजार रुपये लागतील. तेव्हा मुनशाद याला संशय आला आणि आधी सोनं काढून दाखवा त्यानंतर पैसे देतो… असं मुनशाद म्हणाला.

अशात मुनशाद आणि आरोपींमध्ये वाद सुरु झाले. जेव्हा मुनशाद आणि त्याच्या साथीदारांनी खड्डा खोदला, तेव्हा त्यांना सोन्याऐवजी चॉकलेट्स सापडली. फसवणूक झाल्याचं कळल्यानंतर मुनशादने स्वतःचे 15 हजार रुपये परत मागितले, पण आरोपीने नकार दिला. यामुळे दोन्ही गटांमध्ये भांडण सुरू झाले. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्वांना अटक करून पोलीस ठाण्यात आणलं. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Follow Us