मुलगा तुझा नाही, पत्नीचं बाहेर लफडं, नाव सांगितलं तर… चिठ्ठी पाहून भगताचा खळबळजनक दावा

बागेश्वर धामचे भगत करण कुशवाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ते एका व्यक्तीला 'तुझा मुलगा तुझा नाही, बायकोचे लफडं आहे' असे धक्कादायक भाकीत सांगत आहेत. एवढेच नव्हे तर, 'पत्नीला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न कर' असा सल्लाही त्यांनी दिला. या वादग्रस्त दाव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मुलगा तुझा नाही, पत्नीचं बाहेर लफडं, नाव सांगितलं तर... चिठ्ठी पाहून भगताचा खळबळजनक दावा
Karan Kushwah
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 5:42 PM

तो तुझा मुलगा नाही. तुझ्या बायकोचं बाहेर लफडं आहे. मी नाव सांगितलं तर तू त्याचा जीव घेशील… अजयपार धामचा भगत करण कुशवाह याने एका व्यक्तीला हे भाकीत सांगितलं. त्यामुळे या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकलीय. भगत करण कुशवाह याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटकरीही त्यावर चांगलंच ट्रोलिंग करत आहेत. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रमाणेच कुशवाह लोकांना त्यांच्या चिठ्ठ्या पाहून भविष्य सांगतोय. त्यामुळे हा भगत सध्या बराच चर्चेत आला आहे.

या व्हिडीओत भगत करण कुशवाह दिसत आहे. त्याच्यासमोर एक व्यक्ती समस्येची चिठ्ठी घेऊन आल्यावर तो त्याला काही भाकितं सांगतोय. तुझ्या पत्नीने ज्या मुलाला जन्म दिलाय तो तुझा नाहीये. तो दुसऱ्या कुणाचाच मुलगा आहे. तुझ्या पत्नीचं अन्य व्यक्तीसोबत अफेयर सुरू आहे, असंही करण कुशवाह सांगताना दिसत आहे. या व्यक्तीच्या कौटुंबीक जीवनातील अनेक धक्कादायक दावे त्याने केले आहेत.

Loading...

तिला सोड, दुसरीशी लग्न कर

कुशवाहने त्यानंतर पुढचा धक्कादायक सल्ला या व्यक्तिला दिला आहे. तुझ्या पत्नीसोबतचं नातं संपुष्टात आण. तिला सोडचिठ्ठी दे आणि तू दुसरं लग्न कर, असा सल्ला तो देताना दिसत आहे. तुझ्या बायकोचं लफडं कुणासोबत आहे हे मला माहीत आहे. मी त्याचं नाव सांगितलं तर तू त्याला जीवे मारशील. त्याला सोडून देणार नाहीस. त्यामुळे मी तुला त्याचं नाव सांगणार नाही, असं कुशवाह म्हणताना दिसत आहे. दरम्यान या व्हिडीओत करण्यात आलेले दावे आणि या व्हिडीओच्या अधिकृततेबाबतची अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच कुशवाह याच्याकडूनही या व्हिडीओबाबतचा काहीच खुलासा आलेला नाहीये.

सोशल मीडियावर सवाल

कुशवाह याच्या या भयंकर सल्ल्याचा आणि भाकिताचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यावर आता नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. काही लोकांनी कुशवाह याच्या दाव्यांवर सवाल केले आहेत. तर काहींनी अशा प्रकारच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गोष्टी व्हिडीओच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. काहींनी तर या बाबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us