Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान! बँकेचा डेटा लीक, हॅकर्सकडे खातेधारकांचे डिटेल्स, तुमचे पैसे सुरक्षित आहे का?
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँक संबंधित एक मोठी सायबर सुरक्षा घटना समोर आली आहे.

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँक संबंधित एक मोठी सायबर सुरक्षा घटना समोर आली आहे. अहवालानुसार, अंदाजे 1 टीबी बँक डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचा आरोप आहे. याचाच अर्थ बँकेचा डेटा हेक झाला आहे. या डेटामध्ये ग्राहकांची महत्त्वपूर्ण वैयक्तिक बँकिंग माहिती असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. एखाद्या व्यक्तीचा डेटा असा परस्पर लीक होणे हे फारच गंभीर प्रकरण आहे.
अहवालानुसार, लीक झालेल्या डेटामध्ये अनेक पर्सनल कागदपत्रे आणि नोंदींचा समावेश आहे, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
* आधार क्रमांक
* ग्राहकांची नावे आणि वैयक्तिक माहिती
* बचत आणि चालू खात्याचा डेटा
* कर्जाशी संबंधित कागदपत्रे
* नेट बँकिंग वापरकर्त्याचा तपशील
* एनआरआय (NRI) आणि कॉर्पोरेट बँकिंग नोंदी
* ग्राहकांचे अर्ज
* शाखा आणि एटीएमच्या नोंदी
* ग्राहक सहाय्यता (Customer support) संबंधित कागदपत्रे
* बॉबवर्ल्ड (bobWorld) ऑडिट अहवाल
* अंतर्गत संवाद आणि दक्षता तपासाशी संबंधित कागदपत्रे.
— Bank of Baroda (@bankofbaroda) July 27, 2026
बँकेने म्हटले आहे की, या घटनेची माहिती मिळताच तात्काळ आवश्यक पावले उचलण्यात आली आणि प्रकरण नियंत्रणात आणण्यात आले. बँकेने स्पष्ट केले आहे की, बँकेच्या कोअर बँकिंग सिस्टीममध्ये कोणताही प्रवेश करण्यात आला नव्हता आणि ग्राहकांची बँकिंग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे. बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे की, मजबूत सिक्यॉरिटी सिस्टम असून या प्रकरणी सखोल फॉरेंसिक तपास सुरू केला आहे. बँक या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ती माहिती सुरक्षेचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांचा व हितधारकांचा विश्वास जपण्यासाठी कटिबद्ध आहे. असाही दावा करण्यात आला आहे की, कथित हॅकरने काही डेटा सॅम्पल्स आणि डाउनलोड लिंक्स शेअर केल्या आहेत. या बातमीनंतर, अनेक ग्राहक सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहेत.