BAPS स्वामीनारायण संप्रदायाचे संत डॉ ज्ञानवत्सलदास स्वामींच्या आध्यात्मिक कार्याची दखल, अमेरिकेत विविध ठिकाणी सन्मान

BAPS स्वामीनारायण संप्रदायाचे पूज्य आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्ते डॉ. ज्ञानवत्सलदास स्वामी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. जुलै 2025 मधील या दौऱ्यात त्यांच्या आध्यात्मिक कार्याची दखल घेत अमेरिकेतील विविध स्थानिक आणि राज्यस्तरीय मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला.

BAPS स्वामीनारायण संप्रदायाचे संत डॉ ज्ञानवत्सलदास स्वामींच्या आध्यात्मिक कार्याची दखल, अमेरिकेत विविध ठिकाणी सन्मान
Dr Gnanvatsaldas Swami
| Updated on: Jul 31, 2025 | 9:14 PM

BAPS स्वामीनारायण संप्रदायाचे पूज्य आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्ते डॉ. ज्ञानवत्सलदास स्वामी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. जुलै 2025 मधील या दौऱ्यात त्यांच्या आध्यात्मिक कार्याची दखल घेत अमेरिकेतील विविध स्थानिक आणि राज्यस्तरीय मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला. हा सन्मान त्यांच्या आध्यात्मिक कार्याची पावती देतो.

डॉ. ज्ञानवत्सलदास स्वामी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणांनी जगभरातील लाखो लोकांना जीवनात आमुलाग्र बदल घडवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या विचारांनी लाखो लोक प्रभावित झाले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अमेरिकेतील विविध मान्यवरांनी त्यांचा सन्मान करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. डॉ. ज्ञानवत्सलदास स्वामी यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

अमेरिकेत मिळालेले सन्मान

  • यू.एस. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसतर्फे सुहास सुब्रमणियम यांच्या हस्ते आध्यात्मिक समृद्धीसाठी सेवा दिल्याबद्दल सन्मान.
  • डेलावेअर राज्यातर्फे राज्यपाल मॅथ्यू मायर्स यांच्या हस्ते, लोकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन केल्याबद्दल सन्मान.
  • न्यू जर्सी राज्यातर्फे सेनेटर पॅट्रिक डिगन यांच्या हस्ते शाश्वत मूल्यांचे समर्पित राजदूत म्हणून सन्मान.
  • मॅसाच्युसेट्स राज्याकडून स्पीकर रोनाल्ड मॅरियानो आणि राज्य प्रतिनिधी रॉडनी एलियट यांच्या हस्ते लोकांच्या आध्यात्मिक समृद्धीसाठी आणि मानवतेसाठी असामान्य योगदान दिल्याबद्दल विशेष सन्मान.
  • व्हर्जिनिया राज्याकडून सेनेटर कन्नन श्रीनिवासन यांच्या हस्ते समाजातील योगदानासाठी समर्पित सेवा दिल्याबद्दल सन्मानपत्र.
  • व्हर्जिनिया राज्याकडून सेनेटर जेडी डॅनी डिग्स यांच्या हस्ते समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी समर्पण दिल्याबद्दल विशेष सन्मान
  • लोवेल, मॅसाच्युसेट्स शहराचे महापौर डॅनियल रौर्क यांच्या हस्ते एक मान्यताप्राप्त विचारवंत म्हणून असामान्य योगदान दिल्याबद्दल सन्मान.
  • हॅम्प्टन, व्हर्जिनिया शहराचे महापौर जेम्स ए. ग्रे ज्युनियर यांच्या हस्ते जगभरातील लोकांना प्रेरित करणारे विचार सांगितल्याबद्दल सन्मान.
  • व्हर्जिनिया शहराचे महापौर फिलिप जोन्स यांच्या हस्ते जीवन सुधारण्यासाठी असामान्य समर्पण दिल्याबद्दल सन्मान.
  • नॉर्फोक स्टेट युनिव्हर्सिटी व्हाईस प्रेसिडेंट क्लिफोर्ड पोर्टर यांच्या हस्ते नैतिकता आणि ध्येयपूर्ण जीवनावर प्रभावी भाषणाद्वारे लाखो लोकांना प्रेरणा दिल्याबद्दल विशेष सन्मानपत्र देण्यात आले.

BAPS स्वामीनारायण संप्रदायाची माहिती

BAPS स्वामीनारायण संप्रदाय (BAPS) हे एक समाजिक-आध्यात्मिक हिंदू संस्थान आहे. हे संस्थान समाजाच्या कल्याणासाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि मानवीय सेवा देते. या संस्थेचे आध्यात्मिक नेतृत्व महंत स्वामी महाराज हे करत आहेत.