भिकारी नाही लखोपती… एक मुलगा विदेशात, तर दुसरा मोठा उद्योजक, तरीही महिला का मागते भीक?

महिला भीक मागून कमावते लाखो रुपये, तरीही म्हणते 'मी भीक...', एक मुलगा विदेशात करतोय चांगली नोकरी, तर दुसरा मोठ्या उद्योजक... जगतात रॉयल आयुष्य, तरीही महिला का मागते भीक? सध्या सर्वत्र महिलेची चर्चा...

भिकारी नाही लखोपती... एक मुलगा विदेशात, तर दुसरा मोठा उद्योजक, तरीही महिला का मागते भीक?
फाईल फोटो
| Updated on: Sep 02, 2025 | 12:40 PM

देशात भीत मागताना तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल आणि रस्त्यांवर भिकारी भेटतील… पण प्रत्येकाकडे भीक मागण्याचे अनेक वेगळे प्रकार असतात. ज्याच्या मदतीने ते भीक मागतात आणि स्वतःचं पोट भरतात. सांगायचं झालं तर, छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्येही असाच एक प्रकार पाहायला मिळाला आहे, जिथे भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान, एका लखपती भिकारी महिलेचा कमाई जाणून घेताच तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. शिवाया भिकारी महिलेचं सत्य कळल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. यामागील कहाणी खूपच धक्कादायक आहे, भीक मागणारी महिला प्रत्यक्षात लखोपती आहे हे पाहून तुम्हाला धक्का बसेल. कल्याण विभागाने तिला पकडलं तेव्हा यामागील सत्य जाणून विभागाचे अधिकारीही हैराण झाले.

राजधानी रायपूरमधील चौक, मंदिरे, बाजारपेठांमध्ये मोठ्या संख्येने लोक तुम्हाला भीक मागताना दिसतील. यामध्ये लहान मुले आणि वृद्ध महिला देखील दिसतात. पण, सर्वांना चांगल्या सुविधा देण्यासाठी, समाज कल्याण विभागाकडून भिकाऱ्यांचं रेस्क्यू केलं जातं आहे. या भागात, एका लखोपती भिकारी महिलेची संपत्ती जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. एवढंच नाही तर, समाज कल्याण विभागाने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर, शहरात अनेक असे भिकारी आहेत, जे चांगल्या आणि संपन्न कुटुंबातील आहे. पण आज देखील भीक मागून पैसे कमावत आहेत.

राजधानी रायपूरमध्ये एक महिला भिकारी आहे, जी लाखो रुपये कमावते. त्या महिलेचं नाव बेनवती जंघेल असं आहे. महिलेचा एक मुलगा आहे, जो परदेशात चांगली नोकरी करतो. दुसरा उद्योजक आहे. ज्याचं किराणा दुकान आहे. दोन्ही मुलांचं उत्पन्न चांगलं असताना महिला भीक मागते.

जेव्हा अधिकाऱ्यांना महिलेला विचारलं भीक का मागते, यावर महिला म्हणाली, ‘मी भीक मागत नाही तर मला आजार आहे…’ यामुळे ती मंदिरे आणि मशिदींच्या भोवती फिरत होती. महिलेने तिचं घर भाड्यानेही दिलं आहे, ज्यातून तिला दरमहा 5 ते 6 हजार रुपये मिळतात. मात्र, या भिकारी महिलेच्या खात्यात 60 हजार रुपयेही जमा आहेत.

महिलेचे दोन श्रीमंत मुलं…

महिलेचा एक मुलगा परदेशात आहे तर दुसरा मुलगा स्वतःच्या घरात कुटुंबासोबत राहतो. महिला देखील मुलासोबत राहते. महिलेने भाड्याने देखील घर दिलं आहे. महिलेला महिन्याला 8 हजार रुपये भाडं देखील येतं. सध्या समाज कल्याण विभागाने या महिलेला भिकारी पुनर्वसन केंद्रात नेलं आहे. व्यवस्थापक ममता शर्मा यांनी महिलेबद्दल माहिती मागितली आणि ती तिथे भिक्षा का मागते असे विचारले तेव्हा तिने भिक्षा मागण्यास नकार दिला. सध्या, विभाग महिलेचं काउंसलिंग करत आहे आणि लवकरच यामागील सर्व माहिती समोर येईल.