जत्रेतून परतताना अपघात, हॉस्पिटलमध्ये गेला जीव, त्या सेल्फी व्हिडिओने नवा ट्विस्ट… 3 महिन्यांनी उलगडणार मृत्यूचं रहस्य ?

आधी रस्ते अपघात, मग रुग्णालयात मृत्यू आणि 3 महिन्यांना पुन्हा काढला मृतदेह बाहेर... एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल अशी घडामोृ कर्नाटकच्या बेळगावमध्ये घडली. तिथे माजी सैनिकाच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 2 कोटींच्या विम्यासाठी त्याची हत्या केली असा आरोप कुटुंबियांनी त्याच्या पत्नीवर आणि तिच्या प्रियकरावर लावला.

जत्रेतून परतताना अपघात, हॉस्पिटलमध्ये गेला जीव, त्या सेल्फी व्हिडिओने नवा ट्विस्ट... 3 महिन्यांनी उलगडणार मृत्यूचं रहस्य ?
3 महिन्यांनी उकलणार त्या मृत्यूचं गूढ ?
Image Credit source: social media
| Updated on: Aug 08, 2026 | 5:13 PM

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी पोलिसांना कबर उघडून मृतदेह बाहेर काढावा लागला, तर त्याचाच अर्थ असा की त्या मृत्यूची कहाणी, त्याचं गूढ अद्याप संपलेलं नाहीये. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. तेथील माजी सैनिक संदीप मंजारी यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप शमलेलं नाही. खरंतर सुरूवातीला त्यांचा मृत्यू हा रस्ते अपघातानंतर उपचारादरम्यान झाल्याचं मानलं जात होतं. मात्र, काही महिन्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी हत्येचा गंभीर आरोप केल्यानंतर याप्रकरणाला वेगळं वळण मिळाल असून आता पोलिसांना थेट त्यांची कबर गाठावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षांचे संदीप मंजारी हे बेळगावी जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावचे रहिवासी होते. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते तिथे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. याच वर्षी एका मंदिराच्या जत्रेतून घरी परत येत असताना अचानक त्यांचा अपघात झाला. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार त्यांचे अंत्यविधी केले. पण हे प्रकरण तिथेच संपलं नाही..

पत्नीवरच लावला खुनाचा आरोप

कारण, काही काळानंतर संदीप यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार केली. संदीप यांची पत्नी सुमा मंजारी आणि तिचा कथित प्रियकर पुंडलिक डोंबर यांनी मिळून त्यांची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. संदीप यांच्यावर जेव्हा  रुग्णालयात उपचार सुरू होते, तेव्हा या दोघांनी त्यांना ग्लुकोजच्या बाटलीतून विषारी पदार्थ दिला, त्यामुळे अपघातातूनत बचावल्यानंतरही, त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. पण या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

त्या सेल्फी व्हिडीओने आला नवा ट्विस्ट

मात्र, या प्रकरणात, संदीपच्या पत्नीच्यास कथित प्रियकराचा, पुंडलिक डोंबर याचा एक सेल्फी व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाला नव वळण मिळालं आणि संशय आणखी वाढला. या व्हिडिओमध्ये पुंडलिक याने, सुमा हिने संदीप यांच्या कथित 2 कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीबाबत चर्चा केल्याचा दावा केला. विम्याची रक्कम मिळाल्यानंतर दोघेही बेळगावीत नव्याने आयुष्य सुरू करण्याचा विचार करत असल्याचंही त्याने नमूद केलं होतं,  असं उघड झालं . एवढंच नव्हे तसंदीप यांच्या मृत्यूपूर्वी त्याला कीटकनाशक आणण्यास सांगण्यात आले होते, असा गंभीर, खळबळजनक दावाही त्याने या व्हिडीओत केल्याची माहिती समोर आली आहे.

या आरोपांनंतर पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन, संदीप यांच्या मृत्यूनंतर जवळपास तीन महिन्यांनी त्यांची कबर उघडून मृतदेह बाहेर काढला. बेळगावीचे सहाय्यक आयुक्त श्रवण कुमार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया करण्यात आली.  मृतदेहाचे आवश्यक नमुने घेऊन ते फॉरेन्सिक तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (FSL) पाठवण्यात आले आहेत. या अहवालातून संदीप यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

फॉरेन्सिक अहवालाकडे लक्ष

पोलिसांनी संदीप यांची पत्नी सुमा मंजारी आणि पुंडलिक डोंबर यांची चौकशी सुरू केली आहे. यमकनमरडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संदीप यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्यांच्या मृत्यूमागे विम्याच्या पैशांसाठी कट रचण्यात आला होता, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आली नसली तरी पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यात येत असून आणि फॉरेन्सिक अहवालाचाही पोलीस वाट पहात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us