बंगळुरुत Tv9 कन्नड Education Summit, चांगले करियर निवडण्यासाठी तरुणांना मदत…

TV9 कन्नडच्या एज्युकेशन समिट 2025 विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी आहे. उच्च शिक्षणाचे विविध पर्याय,अभ्यासक्रम आणि करिअर मार्गदर्शन,अभियांत्रिकी ते व्यवस्थापनापर्यंत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.

बंगळुरुत Tv9 कन्नड Education Summit, चांगले करियर निवडण्यासाठी तरुणांना मदत...
| Updated on: Apr 04, 2025 | 9:39 PM

तुम्ही तुमच्या करीयरबद्दल कन्फ्युज आहात काय ? SSLC आणि PUC नंतर काय करायचे.तर मग Tv9 कन्नडद्वारा आयोजित एज्युकेशन समिट 2025 तुमच्यासाठी मोठी संधी ठरणार आहे.TV9 कन्नडच्या एज्युकेशन समिट या व्यासपीठावर भारत आणि विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी शोधणाऱ्यांना विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळणार आहे. टीव्ही 9 कन्नड एज्युकेशन समिट बंगळुरुच्या त्रिपुरावासिनी पॅलेस मैदानात भरली आहे. शुक्रवारपासून तिची सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने आले होते. 6 एप्रिलपर्यंत ही समिट रंगणार आहे.

Tv9 कन्नडच्या या एज्युकेशन समिटच्यामध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर संदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविली. या कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठीत कॉलेजच्यावतीने सहकार्यक करण्यात आले. या समिटमध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी बोलण्याची संधी मिळाली.

या विषयावर असेल फोकस –

Tv9 कन्नडच्या या एज्युकेशन समिटमध्ये विद्यार्थ्यांच्या करियर संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. यात खासकरुन इंजीनियरिंग, चिकित्सा, फार्मा, कला तसेच विज्ञान, अग्नी सुरक्षा, होटल व्यवस्थापन , अॅनिमेशन, वाणिज्य, अर्थ, अग्नीसुरक्षा, व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

ही माहीती मिळणार –

या एज्युकेशन समिटमध्ये विभिन्न कोर्सेस संबंधी माहीती बरोबरच या कोर्ससाठी लागणारी शैक्षणिक पात्रतेची देखील माहीती देण्यात आली. समिटमध्ये नामांकित विद्यापीठे आणि संस्थांमधील व्यावसायिक समोरासमोर बसून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यात मदत करणार आहेत.
विविध कोर्सेस संबंधीच्या माहीती यावेळी दिली जाणार आहे.

Tv9 कन्नडच्या या शिखर परिषदेत, नामांकित विद्यापीठे आणि संस्थांमधील व्यावसायिक समोरासमोर बसून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवतील. यात, विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या मार्गाबद्दल आणि आवश्यक शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती मिळेल. जर विद्यार्थी आणि पालक उच्च शिक्षणाशी संबंधित कोणत्याही प्रश्नाबद्दल गोंधळलेले असतील तर ते या शिक्षण समिटला येऊ शकतात आणि तज्ञ्जांकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. या एज्युकेशन समिटमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोफत असून येथे पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.

.