
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. त्याचं गमक कोर्टात गेल्याशिवाय कळत नाही. न्यायासाठी मोठी किंमत मोजावी लागते. न्यायव्यवस्थेत वकिलाशिवाय पान हालत नाही. कायद्याच्या किचकट कसोट्यांवर तर्कशुद्ध युक्तिवादाने तो तुम्हाला कायद्याच्या कचाट्यातून अलगदपणे बाहेर काढतो. तो जीवाचे रान करून अशिलाला न्याय मिळवून देतो. पण त्यासाठीचा त्याचा मेहनताना ऐकून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचं नाही तर हायकोर्टातील वकिलांच्या फी ऐकून घाम फुटल्यशिवाय राहणार नाही. केवळ सुनावणीला हजर राहण्यासाठी २५-२५ लाख शुल्क मोजावे लागते. काही कायदेतज्ज्ञांची फी इतकी की घरादारावर तुळशीपत्र ठेवावे लागेल. विशेष म्हणजे अनेक जण त्यांचा पाच मिनिटांचा वेळ मिळावा म्हणून लाखो रुपये मोजतात. सल्ला घेण्यासाठी सुध्दा मोठी रक्कम मोजावी लागते. या महागड्या वकिलांची वेळ मिळणेच सर्वात कठीण असते. कोण आहेत ही विधीज्ञ, त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? वकील म्हणजे कायदा आणि न्याय यांच्यातील दुवा आहे. न्यूजट्रॅकच्या एका...