corona vaccine | भारत बायोटेकची लस तिसऱ्या टप्प्यात, लवकरच चाचणीला सुरुवात होणार

भारत बायोटेकची लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार असून ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) चाचणीसाठी परवानगी दिली आहे.

corona vaccine | भारत बायोटेकची लस तिसऱ्या टप्प्यात, लवकरच चाचणीला सुरुवात होणार

नवी दिल्ली : कोरोनाला थोपवण्यासाठी हैदराबाद स्थित भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीकडून कोव्हॅक्सीन नावाची लस विकसित केली जात आहे. ही लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार असून ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने तशी परवानगी दिली आहे. 2 ऑक्टोबरला भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी DCGI कडे परवानगी मागितली होती.  ही परवानगी आता मिळाली असून स्वदेशी लस लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bharat biotech company reached third phase of corona vaccine testing)

कोव्हॅक्सीन लस निर्माण करण्यासाठी भारत बायोटेक या कंपनीला ICMR चेही सहकार्य काहे. या कंपनीने क्लिनिकल ट्रायल संदर्भात नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 18 तसेच त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या स्वयंसेवकांवर करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात एकूण 28,500 स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. देशात एकूण दहा ठिकाणी कोव्हॅक्सीन लसीची चाचणी होणार आहे.

मागील महिन्याच्या एका अहवालात भारत बायोटेकने आपली लस ही अत्यंत प्रभावी असून कोरोना व्हायरस विरोधात लढण्यास सक्षम असल्याचा दावा केला होता. प्राण्यांवर चाचणी केल्यानंतर त्यांच्यात चांगली रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाल्याचा दावा कंपनीने केला होता. देशात भारत बायोटेक तसेच झायडस कॅडिला या कंपनीकडूनही लस विकसित करण्यात येत आहे. या कंपनीची लस चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातआहे. पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडूनही लसीवर काम सुरु आहे.

ब्राझिमध्ये चाचणीदरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू

दरम्यान, कोरोना लसीसाठी जगभारात वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे. ब्राझीलमध्ये (Brazil) कोरोना लसीची चाचणी सुरु असताना बुधवारी (21 ऑक्टोबर) एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी तशी माहिती दिली. (Volunteer dies during vaccine test in Brazil)

अ‌ॅस्ट्रोजनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे या लसीची चाचणी बऱ्याच स्वयंसेवकांवर सुरु आहे. या चाचणीदरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. ब्राझील सरकारने गोपनीयतेचे कारण देत मृत्यूबद्दल अधिकची माहिती देण्यास नकार दिला आहे. स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतर अ‌ॅस्ट्रोजनेका कंपनीला मोठा फटका बसला होता. अ‌ॅस्ट्रोजनेका कंपनीचे शेअर्स जवळपास 1.7 टक्क्यांनी पडले होते.

संबंधित बातम्या :

CORONA VACCINE | ब्राझीलमध्ये लसीच्या चाचणीदरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू, चाचणी सुरुच राहणार

Good News: लवकरच येणार कोरोना वॅक्सिन, डिसेंबरपर्यंत मॉडर्ना लसीला मिळणार मंजुरी

बरे झालेल्या कोरोना रुग्णांना अनेक महिन्यांपर्यंत आजाराच्या लक्षणांचा त्रास : ऑक्सफर्ड

(Bharat biotech company reached third phase of corona vaccine testing)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *