अंमली पदार्थ देऊन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार, छोटे कपडे, धर्मांतरासाठी दबाव आणि…, मुस्लीम मैत्रिणीकडून विश्वासघात… प्रकरण हैराण करणारं

मुस्लीम मैत्रिणीकडून हिंदू मुलीचा विश्वासघात..., वेगवेगळ्या ठिकाणी इतक्या पुरुषांनी केला बलात्कार... छोट कपडे, अंमली पदार्थ आणि पब..., धर्मांतराचं धक्कादायक प्रकरण... जाणून व्हाल हैराण

अंमली पदार्थ देऊन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार, छोटे कपडे, धर्मांतरासाठी दबाव आणि..., मुस्लीम मैत्रिणीकडून विश्वासघात... प्रकरण हैराण करणारं
conversion case
| Updated on: Feb 25, 2026 | 11:09 AM

व्यवसायाने ब्युटीशियन असणाऱ्या पीडितीने रुममेट अमरीन हिच्यावर कट रचल्याचे गंभीर आरोप केले आहेत. ऑगस्त 2025 मध्ये अमरीन हिच्या मित्राने पीडितेला बहिणीच्या घरी नेलं, जेथे तिला अंमली पदार्थ देत तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर अमरीन पीडितेला नातेवाईकांना भेटवण्यासाठी घेवून गेली… जेथे अमरीन हिचा भाऊ बिलाल याने चहामध्ये नशेचं औषध टाकून पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर अमरीन पीडितेला वैयक्तिक कामाच्या बहाण्याने अहमदाबादला घेऊन गेली, जिथे यासिर नावाच्या तरुणाने तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केले. पीडितेचा आरोप आहे की, अमरीनचा जवळचा मित्र चंदन यादव यानेही तिच्यावर बलात्कार केला.

पब, लाउंज आणि धर्मांतराचा दबाव

पीडितेने तक्रारीत दाखल केल्याप्रमाणे, पीडितेला बळजबरी छोटे कपडे घावून पब आणि लाउंजमध्ये अनेकदा नेलं होतं. तिच्या अनोळखी लोकांसोबत भेटी करून, त्यांच्यासोूत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जायचं… कथित आरोपींनी अनेकदा पीडितेवर धर्मांतराचा देखील दबाव टाकला होता… पीडितेने विरोध केल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.

पोलिसांची कारवाई आणि FIR

घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी चार आरोपींवर तक्रार दाखल केली आहे. बिलाल, यासिर आणि चंदन यादव यांच्या विरोधात बलात्कार, अंमली पदार्थ देण्याचे आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, कट रचणे आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एका आरोपीला अटक केली आहे. इतर तीन मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके छापे टाकत आहेत.

मध्य प्रदेशच्या राजधानीत धर्मांतर आणि लैंगिक शोषणात गुंतलेल्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील दोन तरुणींनी भोपाळमधील बागसेवानिया पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दुसऱ्या पीडितेची देखील तक्रार समोर

याप्रकरणा अन्य एका तरुणीने समोर येत स्वतःसोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. तिने देखील बागसेवानिया पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नशेचं औषध देत गँगरेप केल्याची तक्रार पीडितेने केली. पोलीस आता याप्रकरणी कसून चौकशी करत आहे…